आम्ही आधीपासूनच चंद्रावर रहात आहोत !

पाकिस्तानी नागरिकाची चंद्रयानाच्या यशस्वीतेवरून पाकवरच उपरोधिक टीका

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारताचे ‘चंद्रयान-३’ चंद्रावर यशस्वीपणे उतरल्यावर पाकिस्तानातही चांगल्या आणि वाईट अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या संदर्भात तेथील एका ‘यू ट्यूब चॅनल’चा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यात एक पाकिस्तानी नागरिक ‘आम्ही चंद्रावरच रहात आहोत’, असे उपरोधिक म्हणत पाकवर टीका करतांना दिसत आहे.

या नागरिकाने म्हटले, ‘‘भारत पैसे खर्च करून चंद्रावर जात आहे; पण आम्ही आधीपासूनच चंद्रावर रहात आहोत; कारण चंद्रावर पाणी नाही, तसे येथेही (पाकिस्तानात) पाणी नाही. चंद्रावर गॅस नाही, तसा पाकिस्तानातही गॅस नाही. चंद्रावर वीज नाही, तशी येथेही वीज नाही. त्यामुळे आम्ही आधीपासूनच चंद्रावर रहात आहोत.’ (आता पाकमधील नागरिक स्वतःची ‘पाकिस्तानी’ अशी ओळख सांगत आहेत; मात्र पुढील काही वर्षांत ‘पाकिस्तान’ नावाचा देशही शेष रहाणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

स्वतःच्या देशाची अशा प्रकारचे खिल्ली उडवण्याची स्थिती येईपर्यंत काहीही न करणारे पाकिस्तानीच या वाईट स्थितीला उत्तरदायी आहेत !