|
अजमेर (राजस्थान) – येथील सोफिया शाळेतील सर्व विद्यार्थ्यांकडून ‘क्रीडा प्रकारां’च्या नावाखाली वैद्यकीय प्रमाणपत्र मागवण्यात आले आहे. यामध्ये त्यांना त्यांची कंबर आणि नितंब यांचा आकारही सांगण्याची सूचना करण्यात आली आहे. अशा प्रकारची माहिती मागवण्यात आल्यावरून विद्यार्थिनींच्या पालकांनी संताप व्यक्त केला आहे. ही तीच शाळा आहे ज्यामध्ये १९८० आणि १९९० च्या दशकांमध्ये लैंगिक अत्याचारांची प्रकरणे उघडकीस आली होती. यामध्ये अजमेर दर्ग्यातील चिश्ती परिवाराचे लोक, तसेच अनेक काँग्रेसवाले यांचा हात असल्याचे समोर आले होते. यावर नुकताच ‘अजमेर ९२’ हा चित्रपटही प्रसारित झाला आहे.
‘कमर और नितंब का आकार बताओ’: अजमेर के सोफिया स्कूल का फरमान, इसी स्कूल की छात्राएँ थी देश के सबसे बड़े सेक्स स्कैंडल की पीड़िताएँ#Ajmer #SophiaSchoolhttps://t.co/874p2GBYit
— ऑपइंडिया (@OpIndia_in) August 23, 2023
अजमेरच्या ‘सोफिया सीनियर सेकेंड्री स्कूल’मध्ये २ सहस्र ५०० हून अधिक विद्यार्थी शिकतात. या सर्वांकडून ‘स्वास्थ्य आणि कार्य कार्ड’च्या नावाखाली एक फॉर्म भरण्यासाठी सांगण्यात आले होते. यामध्ये खेळांचे नाव लिहिण्यात आले असून आणि खालच्या भागामध्ये ‘हेल्थ रेकॉर्ड’च्या रकान्यात दृष्टी, कान, दात यांच्या स्थितीसह नाडीचे ठोके, उंची, तसेच कंबर आणि नितंब यांचा आकार लिहिण्यास सांगण्यात आले आहे. तसेच यासाठी रुग्णालयातून वैद्यकीय प्रमाणपत्र आणण्यासाठीही सांगण्यात आले आहे.
शाळेचे प्रतिनिधी सुधीर तोमर यांचे म्हणणे आहे की, या फॉर्मच्या माध्यमातून मुलांचा ‘बॉडी मास्क इंडेक्स’ काढून त्यांच्या शरिरानुसार त्यांना कोणत्या खेळांमध्ये सहभागी करवून घ्यायचे, ते ठरवता येणार आहे.
संपादकीय भूमिकाविद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्या खेळाच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाने काही नियम ठरवून दिले आहेत. त्यांच्याकडे कानाडोळा करून अशा प्रकारे अनावश्यक माहिती मागवणार्या शाळा व्यवस्थापनावर कारवाई व्हायला हवी ! |