‘इस्रो’ सूर्याचा अभ्यास करणार्‍यासाठी पुढील मासात ‘आदित्य एल् १’ यान अवकाशात पाठवणार !

सौजन्य: isro

बेंगळुरू (कर्नाटक) – सूर्य आणि सूर्याभोवतीच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) सप्टेंबर मासात ‘आदित्य एल् १’ हे यान अवकाशात पाठवणार आहे. सूर्याचा अभ्यास करणारी ‘इस्रो’ची ही पहिलीच मोहीम आहे. या मोहिमेसाठी ३७८ कोटी रुपये खर्च येणार आहे. या मोहिमेचा कालावधी ५ वर्षांचा आहे.

१. ‘आदित्य एल् १’ हे यान पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील ‘लोअर अर्थ ऑर्बिट’पर्यंत नेण्यात येणार आहे. (लोअर अर्थ ऑर्बिट म्हणजे संबंधित ग्रहापासूनचे सर्वांत जवळचे अंतर. याचा परिघ १६० कि.मी. ते २ सहस्र कि.मी. इतका असतो.) हे अंतर पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणाहून कोणत्याही अडथळ्याखेरीज सूर्यावरील अडथळ्यांचा अभ्यास करता येणे शक्य होणार आहे. तेथून पृथ्वीवर पाठवण्यात येणारे संदेशही अल्पावधीत पोचू शकतील.

२. या यानाद्वारे सूर्यावरील घडामोडींमुळे वातावरणात निर्माण होणारी उष्णता आणि ज्वाला यांचे निरीक्षण करण्यात येणार आहे, तसेच सौरवादळे आणि सौरस्फोट यांतून निर्माण होणार्‍या ज्वालांच्या प्रक्रियांचे संशोधन करण्यात येणार आहे. अवकाशातील वातावरणावर परिणाम करणार्‍या सौर वार्‍याचा उगम, त्यातील घटक आणि अन्य घडामोडी यांचा अभ्यास करण्यात येणार आहे.