चीनच्या परराष्ट्र मंत्रीपदी वांग यी यांची नियुक्ती !

चिनी सरकारने एक मासापासून गायब असलेले त्याचे परराष्ट्रमंत्री किन गैंग यांना पदावरून हटवले आहे. त्यांच्याजागी वांग यी यांची मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वांग हे वर्ष २०१३ ते २०२२ या कालावधीतही चीनचे परराष्ट्र मंत्री होते.

गोरखा सैनिकांच्या भारतीय सैन्यातील भर्तीवर नेपाळने ठोस निर्णय घेतलेला नाही !

नेपाळने अग्निपथ योजनेच्या अंतर्गत भारतीय सैन्यामध्ये त्याच्या गोरखा सैनिकांच्या भर्तीवर साधारण एक वर्षापूर्वी स्थगिती आणली होती. असे असले, तरी हे प्रकरण पूर्णत: समाप्त झालेले नाही, असे वक्तव्य भारतातील नेपाळचे राजदूत शंकर प्रसाद शर्मा यांनी केले.

पुढील ३ दिवस देशातील २२ राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता !

दक्षिण आणि किनारी ओडिशातील अनेक भागांत मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. मच्छिमारांना २७ जुलैपर्यंत समुद्रात न जाण्याची सूचना देण्यात आली आहे.

सर्व शासकीय कार्यालये आणि शाळा यांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा लावण्यात यावी !- रवींद्र धंगेकर, आमदार, काँग्रेस

छत्रपती संभाजी महाराज यांचा राष्ट्रपुरुषांच्या सूचीत समावेश करावा, तसेच शाळा आणि सर्व शासकीय कार्यालये यांमध्ये त्यांची प्रतिमा लावण्यात यावी.

विरोधकांचा केंद्र सरकारविरुद्धचा अविश्‍वास प्रस्ताव लोकसभेच्या अध्यक्षांनी स्वीकारला !

मणीपूरमध्ये चालू असलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी विरोधी पक्षांनी लोकसभेमध्ये २६ जुलै या दिवशीही केंद्र सरकारवर टीका करत मोदी सरकारच्या विरोधात अविश्‍वास प्रस्ताव मांडला. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तो स्वीकारून ‘चर्चेचा दिनांक नंतर निश्‍चित केला जाईल’, असे सांगितले.

..तर विधीमंडळ सभागृहाचे ‘मिडिया हाऊस’ होईल ! – राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा

सर्व सदस्यांनी बोलण्यासाठी हात उंचावल्यास कुणाला अनुमती द्यावी, याविषयी अध्यक्षांपुढे प्रश्न निर्माण होतो. बोलायला दिले नाही, तर सदस्य गोंधळ घालतात.

आतंकवाद्यांवर बंदी घालण्यासाठी ‘ब्रिक्स’ देश संघटितपणे काम करू शकतात ! – भारत

संयुक्त राष्ट्रांच्या आतंकवादविरोधी प्रतिबंध व्यवस्थेच्या अंतर्गत आतंकवादी आणि त्यांचे प्रतिनिधी यांची सूची बनवण्यामध्ये ब्रिक्स देश संघटितपणे काम करू शकतात.

सिंधुदुर्ग : अतीवृष्टीमुळे महावितरणची  ३२ लाख रुपयांची हानी 

ग्राहकांचा वीजपुरवठा लवकर सुरळीत व्हावा, यासाठी वीज कर्मचारी काम करत आहेत, तरी नैसर्गिक आपत्तीच्या कठीण प्रसंगी नागरिकांनी संयम बाळगून सहकार्य करावे. असे आवाहन महावितरणचे कोकण विभाग जनसंपर्क अधिकाऱ्यांनी केले आहे.

अंजूसारखे मी पाकमध्ये केले असते, तर मला ठार मारले असते ! – सीमा हैदर

राजस्थानच्या भिवाडी येथील अंजू या विवाहित ख्रिस्ती महिलेने पाकिस्तानमध्ये जाऊन तिच्या प्रियकराशी विवाह केला आहे. तिने इस्लाम धर्मही स्वीकारला आहे. विशेष म्हणजे अंजू हिंदु होती आणि नंतर ती ख्रिस्ती झाली होती.

गोव्यात ‘उबेर’ टॅक्सीसेवेला अनुमती देणार नाही ! – वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो

‘उबेर’ या  ‘ॲप’च्या माध्यमातून ‘टॅक्सी’सेवा देणार्‍या आस्थापनाने हल्लीच गोव्यात काही निवडक मार्गांवर ‘टॅक्सी’ सेवेला प्रारंभ केल्याचे वृत्त असल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री गुदिन्हो यांनी ही माहिती दिली.