अंजूसारखे मी पाकमध्ये केले असते, तर मला ठार मारले असते ! – सीमा हैदर

नवी देहली – राजस्थानच्या भिवाडी येथील अंजू या विवाहित ख्रिस्ती महिलेने पाकिस्तानमध्ये जाऊन तिच्या प्रियकराशी विवाह केला आहे. तिने इस्लाम धर्मही स्वीकारला आहे. विशेष म्हणजे अंजू हिंदु होती आणि नंतर ती ख्रिस्ती झाली होती. या प्रकरणाविषयी पाकमधून भारतात आलेली सीमा हैदरला प्रश्‍न विचारला असता ती म्हणाली की, अंजू भारतात रहात होती. भारत हा असा देश आहे जिथे लोक काहीही करू शकतात; कारण त्यांना तसे वागण्याचे स्वातंत्र्य असते. पाकिस्तान असा देश आहे जिथे हे कळले असते की, मी देश सोणार आहे, तर माझ्यासमवेत काहीही बरेवाईट घडू शकले असते. हैदरला (सीमाचा नवरा) समजले असते की, माझे हिंदु मुलावर प्रेम आहे, तर त्याने माझी हत्या केली असती.

सौजन्य एबीपी न्यूज 

भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये महिलांना जी वागणूक मिळते, त्याविषयी  विचारले असता सीमा म्हणाली की, पाकचे सिंध आणि बलुचिस्तान हे असे प्रांत आहेत जिथे महिलांना जराही आदराची वागणूक दिली जात नाही. सिंधमध्ये माझ्या वयाची एकही महिला शिकलेली नाही. एखाद्या महिलेची ओढणी जर डोक्यावरून खाली आली, तर तिला शिवीगाळ केली जाते. सिंध आणि बलूचिस्तान या प्रांतांत महिलांसाठी अतिशय कठोर नियम आहेत. आम्हाला बुरखा परिधान करावा लागतो. भारतात मात्र ती स्थिती नाही. भारतात महिलांचा पुष्कळ आदर केला जातो. मी भारतात आले आहे, तेव्हापासून मलाही आदराने वागवले जात आहे.