आतंकवाद्यांवर बंदी घालण्यासाठी ‘ब्रिक्स’ देश संघटितपणे काम करू शकतात ! – भारत

(ब्रिक्स देश म्हणजे ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समूह)

उजवीकडून दुसऱ्यास्थानी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल

जोहान्सबर्ग  (दक्षिण आफ्रिका) – संयुक्त राष्ट्रांच्या आतंकवादविरोधी प्रतिबंध व्यवस्थेच्या अंतर्गत आतंकवादी आणि त्यांचे प्रतिनिधी यांची सूची बनवण्यामध्ये ब्रिक्स देश संघटितपणे काम करू शकतात. त्यातही हे महत्त्वाचे आहे की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद प्रतिबंध समितीचा निर्णय राजकारण आणि दुटप्पीपणा यांपासून मुक्त असला पाहिजे, अशा शब्दांत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीन आणि पाकिस्तान यांचे नाव न घेता त्यांना सुनावले. येथे ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीत ते बोलत होते. यात ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे.

डोवाल पुढे म्हणाले की, आतंकवाद राष्ट्रीय शांती आणि सुरक्षा यांसाठी असलेल्या प्रमुख धोक्यांपैकी एक आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या देशांमध्ये आतंकवादी संघटना निर्धास्तपणे कारवाया करत आहेत.