जळगावच्या वसतीगृहाच्या महिला गृहपाल सुट्टीवर गेल्याने पुरुष शिपायाकडे दायित्व !

महिला वसतीगृहात पुरुष कर्मचार्‍यांना बंदीचा आदेश असतांनाही त्याकडे कानाडोळा करणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई करायला हवी !

लोणावळा येथील भुशी धरण दुथडी भरून वाहू लागले !

शहरात २४ घंट्यात १५८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, तसेच येथील पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेले भुशी धरण ३० जूनला रात्री १० वाजता ‘ओव्हरफ्लो’ झाले आहे. मागील काही दिवसांपासून सलग पडणार्‍या पावसामुळे येथील डोंगर भागातून मोठे मोठे धबधबे वाहू लागले आहेत.

भ्रष्टाचाराचा आरोप करत ठाकरे गटाचा मुंबई महापालिकेवर मोर्चा !

महागनरपालिकेच्या कारभारामध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली १ जुलै या दिवशी मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला.

कर्नाटकातील हिंदूंना हे मान्य आहे का ?

‘अल्लाच्या कृपेने कर्नाटकात काँग्रेस सरकार आले आहे. तुमच्या (मुसलमानांच्या) आशीर्वादाने मी गृहमंत्री झालो आहे’, असे विधान कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी बकरी ईदच्या दिवशी केले.

बकरे आणणार्‍या मुसलमान कुटुंबातील महिलेकडून हिंदूंवर विनयभंगाची तक्रार !

मीरारोड येथे सोसायटीमध्ये ईदनिमित्त कुर्बानीसाठी बकरे आणल्याचे प्रकरण !

केंद्रेकर यांना स्वेच्छा निवृत्ती घेण्यास सरकारने भाग पाडले ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

येथील विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या स्वेच्छा निवृत्तीनंतर राजकीय वातावरण तापत आहे. सरकारला प्रामाणिक अधिकारी नकोत. केंद्रेकर यांना स्वेच्छा निवृत्ती घेण्यास सरकारने भाग पाडले आहे, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला…

जळगाव येथे वाहनावर झाड कोसळल्याने पोलीस अधिकार्‍यासह चालक ठार !

या दुर्घटनेत नाशिक येथील आर्थिक गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर यांच्यासह चालक अजय चौधरी यांचे निधन झाले आहे. ३० जून या दिवशी हा प्रकार घडला. दातीर यांच्या पश्चात पत्नी, ८ मासांचा मुलगा, आई-वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.  

गोरक्षकांवरील आक्रमणे, धर्मांतर आणि लव्ह जिहाद यांच्या विरोधात आज मालेगाव येथे हिंदूंचा मोर्चा !

भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली २ जुलै या दिवशी मालेगाव येथे गोरक्षकांवरील आक्रमणे, धर्मांतर, लव्ह जिहादच्या विरोधात ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ काढला जाणार आहे. सकाळी १० वाजता रामसेतू पुलाजवळील श्रीराम मंदिरात महाआरती करून मोर्च्याला प्रारंभ होईल

गोहत्या प्रकरणी कडूस परिसरात (पुणे) जमावबंदीचे आदेश लागू !

आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजेच २९ जून या दिवशी येथील अवैध पशूवधगृहावर बजरंग दलाचे कार्यकर्ते, तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या साहाय्याने पोलिसांनी धाड टाकली होती. या वेळी दिवसाढवळ्या चालू असलेला गोहत्येचा प्रकार उघडकीस आला.

पाकिस्तानमध्ये १ सहस्र ५५० हून अधिक मंदिरे पाडून त्याजागी बांधल्या गेल्या भव्य इमारती !

भारतात अल्पसंख्यांक मुसलमान असुरक्षित असल्याचा कांगावा करणारी अमेरिका आणि इस्लामी देश पाकिस्तानमधील हिंदूंच्या या दुःस्थितीविषयी गप्प का ? याविषयी भारत सरकार पाकला खडसावणार का ?