शहरात २४ घंट्यात १५८ मि.मी. पावसाची नोंद
लोणावळा (जिल्हा पुणे) – शहरात २४ घंट्यात १५८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, तसेच येथील पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेले भुशी धरण ३० जूनला रात्री १० वाजता ‘ओव्हरफ्लो’ झाले आहे. मागील काही दिवसांपासून सलग पडणार्या पावसामुळे येथील डोंगर भागातून मोठे मोठे धबधबे वाहू लागले आहेत. यामुळे आकाराने लहान असलेल्या भुशी धरणाची पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आणि भुशी धरण ५ दिवसांत ‘ओव्हरफ्लो’ झाले आहे.
मागील वर्षी जुलैच्या ६ तारखेलाच भुशी धरण ‘ओव्हरफ्लो’ झाले होते. त्यामानाने यंदा धरण लवकरच ‘ओव्हरफ्लो’ झाले आहे. भुशी धरणाच्या पायर्यांवरून फेसाळत वहाणार्या पाण्यात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी लोटण्याची शक्यता आहे.