प्रदीप कुरुलकर यांनी क्षेपणास्त्रासह ‘आकाश लाँचर’ची सर्व गुपिते पाकिस्तानला दिल्याचे ए.टी.एस्.च्या अन्वेषणात निष्पन्न !

कुरुलकर यांनी डी.आर्.डी.ओ.त विकसित केलेल्या ‘कंपोझिट हल’, ‘ब्रह्मोस लाँचर’, ड्रोन, यू.सी.बी. ‘अग्नी मिसाईल लाँचर’, ‘मिलिटरी ब्रिजिंग सिस्टिम’ आणि ‘मिलिटरी इंजिनिअरिंग इक्विपमेंट’ सिद्ध करणे, विकसित करणे, ‘डिझाइन’ करण्याचे काम आणि इतर सुरक्षेसंबंधित गोपनीय संवेदनशील माहिती झारादास गुप्ता नाव धारण केलेल्या  पाकच्या महिलेला दिली.

मूर्तीकारांना नि:शुल्क जागा आणि घरगुती स्तरावर शाडूच्या मूर्तीचे बंधन !

मूर्ती शाडूची मातीची असल्यास त्यातून प्रदूषणही होत नाही. त्यामुळे प्रशासनाने उत्सव धर्मशास्त्रानुसार साजरे करण्याची भूमिका घ्यावी !

पनवेल रेल्वे स्थानकात ५ मुसलमानांकडून नमाजपठण !

सार्वजनिक ठिकाणी ५ मुसलमानांकडून नमाजपठण करत असतांना अन्य प्रवासी काय करत होते ? त्यांना नमाजपठण करण्यापासून कुणीच का रोखले नाही ?

कोल्हापूर येथील राजाराम बंधार्‍यांवर पाणी आल्याने कसबा बावडा ते वडणगे वाहतूक बंद !

पंचगंगा नदीवरील राजाराम बंधार्‍यावर १ फूट पाणी आल्याने कसबा बावडा ते वडणगे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतले कोल्हापूर येथे श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी ७ जुलै या दिवशी साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले.

श्री. विनायक देशपांडे यांना वर्ष २०२३ चा ‘सार्वजनिक काका’ पुरस्कार प्रदान !

पुणे – येथील सुपर्ण कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमात पुणे सार्वजनिक सभेच्या वतीने वर्ष २०२३ चा ‘सार्वजनिक काका’ पुरस्कार श्री. विनायक काशिनाथराव देशपांडे यांना प्रदान करण्यात आला.

नगरमधील बडीसाजन मंगल कार्यालयात १८ ते २७ जुलै या कालावधीत श्रीरामकथा ज्ञानयज्ञ सोहळा !

नगर येथील बडीसाजन ओसवाल श्री संघ कार्यालयात १८ ते २७ जुलै २०२३ या कालावधीत श्रीरामकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचा शुभारंभ शोभायात्रेने करण्यात येणार असून त्याची जय्यत सिद्धता करण्यात आली आहे.

श्री तुळजाभवानीमातेच्या अभिषेक पूजेचे शुल्क ५० वरून ५०० रुपये !

मंदिर सरकारीकरणाचा हा दुष्परिणाम होय. मंदिरांच्या संदर्भात योग्य निर्णय होण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यातच हवीत !

बेळगाव येथील जैन मुनि कामकुमार नंदी महाराज यांची हत्या

बेळगाव येथील जैन मुनि कामकुमार नंदी महाराज हे ५ जुलैपासून बेपत्ता होते. मुनींची हत्या करून त्यांचा मृतदेह फेकून देण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी २ जणांना अटक केली असून त्यांनी हत्या केल्याची स्वीकृती दिली आहे.