पनवेल रेल्वे स्थानकात ५ मुसलमानांकडून नमाजपठण !

  • मनसेच्या चेतावणीनंतर पोलीस आणि रेल्वे अधिकारी खडबडून जागे !

  • पुन्हा असा प्रकार होणार नसल्याचे आश्‍वासन

सौजन्य :वादळवारा

पनवेल, ८ जुलै (वार्ता.) – पनवेल रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांच्या ये-जा करण्याच्या मार्गावर ५ मुसलमानांकडून नमाजपठण करण्यात आले. या संदर्भातील व्हिडिओ सध्या सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहे. या प्रकरणी प्रवासी संतप्त झाले आहेत. मनसेचे प्रवक्ते तथा पनवेल महानगराचे शहरअध्यक्ष योगेश चिले यांनी या प्रकाराची गंभीरपणे नोंद घेतली. चिले यांनी ७ जुलैला दुपारी एक व्हिडिओ प्रसारित करून त्यात म्हटले, ‘या देशात सर्वधर्मसमभाव आहे, हे सिद्ध करण्यासाठी पनवेल रेल्वे स्थानकामध्ये यावे. रेल्वे स्थानकावर जर नमाज चालतो, तर महाआरतीसुद्धा नक्की चालणार. समस्त भाविकांनी पनवेल रेल्वे स्थानकामध्ये महाआरतीसाठी उपस्थित रहावे.’’

यानंतर पोलीस आणि रेल्वे अधिकारी यांनी मनसे अन् अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या पदाधिकार्‍यासह बैठक घेतली. यामध्ये प्रशासनाने ‘यापुढे असा प्रकार होणार नाही’, असे आश्‍वासन दिले. ‘स्थानकामध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल’, असेही रेल्वे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी महाआरतीचे केलेले नियोजन रहित केले. ‘यापुढे असे कुठलेही प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत आणि जशास तशी प्रतिक्रिया व्यक्त केली जाईल’, असे मनसेकडून सांगण्यात आले.

संपादकीय भूमिका

  • सार्वजनिक ठिकाणी ५ मुसलमानांकडून नमाजपठण करत असतांना अन्य प्रवासी काय करत होते ? त्यांना नमाजपठण करण्यापासून कुणीच का रोखले नाही ? यावरून मुसलमानांची कट्टरता, तर अन्यांमधील धर्माभिमानाचा अभावच दिसून येतो !
  • आज ५ मुसलमान जमले, उद्या १०० जण रेल्वे स्थानकात नमाज पढले, तर आश्‍चर्य वाटायला नको !