मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतले कोल्हापूर येथे श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन !

मंत्री हसन मुश्रीफ यांचा श्री महालक्ष्मीदेवीची प्रतिमा देऊन स्वागत करतांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार, तसेच अन्य

कोल्हापूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी ७ जुलै या दिवशी साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. या प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी श्री महालक्ष्मीदेवीची प्रतिमा, शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी श्री महालक्ष्मी मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे, धर्मशास्त्र मार्गदर्शक नेर्लेकर, श्रीपूजन केदार मुनीश्वर यांसह अन्य उपस्थित होते.