नाशिक येथील साधू-महंतांची आंदोलनाद्वारे मागणी
नाशिक – भगवान श्रीरामावर आधारित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या विरोधात नाशिकमधील संत आणि महंत यांनी एकत्रित येऊन आंदोलन केले. ‘आमच्या देवतांचा अवमान करणार्या अशा चित्रपटांना केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ प्रमाणपत्रच कसे देते ? या चित्रपटावर बंदी आणा’, अशी मागणी या वेळी करण्यात आली. संत आणि महंत यांनी चित्रपटाच्या विरोधात घोषणाही दिल्या.
संपादकीय भूमिका :अशी मागणी करण्यासाठी साधू-महंतांना आंदोलन करावे लागणे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने या चित्रपटावर स्वत:हूनच बंदी घातली पाहिजे ! |