राष्ट्राच्या उत्थानासाठी योग आणि अध्यात्म यांची आवश्यकता ! – डॉ. सत्यमेव जयते लोक मंगल, अध्यक्ष, सत्यमेव जयते

डॉ. सत्यमेव जयते लोक मंगल

भारत स्वतंत्र झाल्यानंतर शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचार थांबलेला नाही. शासकीय कार्यालये, शाळा यांमध्ये योग आणि अध्यात्म यांचे शिक्षण दिल्यास भ्रष्टाचार रोखता येईल. अध्यात्म ही भारताची शक्ती आहे. शासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अध्यात्माविना भारत कमकुवत आहे. समाजामध्ये अध्यात्माचा प्रसार केल्यास राष्ट्र निर्माणाचे कार्य सुलभ होईल. शासकीय कार्यालयांमध्ये अध्यात्म, ध्यानधारणा आणि योग यांचे शिक्षण दिले असते, तर सुराज्याची संकल्पना साध्य झाली असती. ‘अध्यात्म’ ही भारताची महानता आहे. सर्व हिंदु समाज अध्यात्माचा अंगीकार करेल, तेव्हा भारत सूर्याप्रमाणे तेजस्वी होईल. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हे आपले ध्येय आहे. हिंदूंनी साधना केली तरच ही संकल्पना साध्य होऊ शकेल. हिंदु राष्ट्राची स्थापना करतांना पुढील १ सहस्र वर्षांचा आराखडा निश्चित करायला हवा, असे उद्गार ‘सत्यमेव जयते’ या संघटनेचे अध्यक्ष डॉ. सत्यमेव जयते लोक मंगल यांनी काढले. ते येथे चालू असलेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या पाचव्या दिवशी (२०.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.