‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’तील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !

१. अधिवेशनात सहभागी हिंदुत्वनिष्ठांना एकमेकांना भेटल्याचा पुष्कळ आनंद झाल्याचे दिसून आले. अधिवेशनाच्या मध्यंतराच्या वेळेत सर्व हिंदुत्वनिष्ठ एकमेकांची आस्थेने चौकशी करत होते. या वेळी सर्व हिंदुत्वनिष्ठांमध्ये कुटुंबभावना दिसून आली.

२. अधिवेशनाच्या निमित्ताने ‘#HinduRashtra’ हा ‘की वर्ड’ ‘ट्विटर ट्रेंडिंग’मध्ये होता. त्याद्वारे हिंदु राष्ट्राची चर्चा देशभर चालू असल्याचे दिसून आले.

अधिवेशनाच्या ठिकाणी असलेले वैशिष्ट्यपूर्ण फलकांचे प्रदर्शन !

१. ‘जगात एकही हिंदु राष्ट्र नाही’, याची माहिती देणारा फलक सभागृहाच्या प्रदर्शनात लावण्यात आला होता. यामध्ये जगातील मुसलमान, ख्रिस्ती, बौद्ध, तसेच अन्य धर्मीय राष्ट्रांची आकडेवारी देण्यात आली होती. त्यामध्ये दिलेली जगात एकही हिंदु राष्ट्र नसल्याची माहिती भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी उद्युक्त करणारी होती.

२. ‘हिंदु राष्ट्र कसे असेल ?’, या फलकाद्वारे ‘हिंदु राष्ट्रामध्ये ‘शासनकर्ते, कायदा, समाज, दंडनीती, संरक्षणव्यवस्था, धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था कशी असेल ?’, याविषयी माहिती देण्यात आली होती.

यासह अध्यात्मविषयक माहिती, हिंदु जनजागृती समिती, हिंदु विधीज्ञ परिषद यांच्या विविधांगी कार्याची माहिती देणारे विविध फलक सभागृहाच्या ठिकाणी लावण्यात आले होते.