हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिदिन प्रार्थना करा !

१. हिंदूंनो, ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज आदींप्रमाणे आदर्शरित्या राज्य करणार्‍या राज्यकर्त्यांचे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन होवो’, यासाठी प्रतिदिन प्रार्थना करा !

२. ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी उपक्रम किंवा आंदोलन होत असल्यास त्याच्या यशस्वितेसाठी उपास्यदेवतेला प्रार्थना करा.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे वक्ते नेहमीच भगवान श्रीकृष्णाला वंदन करून हिंदु राष्ट्राविषयीच्या भाषणाला प्रारंभ करतात. तसेच भाषणाच्या शेवटीही ते प्रार्थना करतात. त्यामुळे देवाचा आशीर्वाद मिळायला साहाय्य होते.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’)