‘सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ४ वर्षे) यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आपण सर्वांनी कसे प्रयत्न करायचे ? परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी श्रद्धा आणि भाव कसा ठेवायचा ?’, या संदर्भात हिंदी भाषेत ध्वनीमुद्रण (ऑडिओ रेकॉर्डिंग) केले आहे. त्यातील त्यांचे बोलणे सहज आणि सलग आहे. पू. वामन यांनी आरंभी हिंदु राष्ट्र येण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना केली. त्यांचे हिंदु राष्ट्राविषयीचे विचार आणि ज्ञान बघून आश्चर्यचकित होऊन मी श्री गुरुचरणी नतमस्तक झाले.’
– सौ. मानसी राजंदेकर (पू. वामन यांची आई, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) |
१. पू. वामन यांनी हिंदु राष्ट्र येण्यासाठी करायच्या प्रयत्नांविषयी केलेले मार्गदर्शन !
१ अ. हिंदु राष्ट्र येईपर्यंत परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सेवा आणि स्मरण करा ! : ‘आता आपण सर्व जण नारायणांच्या (टीप १) चरणांशी लीन होऊन अधिवेशनाची (वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाची) सेवा करूया. हिंदु राष्ट्र खरोखरच येणार असून तोपर्यंत आपण इतर कुठेही न जाता अधिकाधिक संख्येने आश्रमात राहून सतत हिंदु राष्ट्रासाठी, म्हणजेच नारायणांची सेवा करायची आहे. आपण प्रत्येक क्षणी नारायणांचे स्मरण करायचे आहे. आपल्याला जे हवे आहे, ते हिंदु राष्ट्रातच मिळणार आहे.
टीप १ : पू. वामन परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘नारायण’, असे म्हणतात.
१ आ. आपण प्रतिदिन हिंदु राष्ट्राची सेवा करू, तरच आपल्याला हिंदु राष्ट्र पहायला मिळणार आहे. आपण सर्व जण नारायणांचे सैनिक आहोत.
१ इ. हिंदु राष्ट्रासाठी सेवा करतांना आपण सर्वांनी ‘नारायणांना जे अपेक्षित आहे, तेच आणि ज्यातून हिंदु राष्ट्रासाठी सेवा होणार आहे, तेच कार्य करायचे आहे. आपण जितकी अधिक सेवा करू, तितके आपण हिंदु राष्ट्रात रहाण्यास पात्र ठरू.
१ ई. हिंदु राष्ट्रासाठी सेवा केल्यामुळे आपण आश्रमात, म्हणजेच वैकुंठात राहू शकतो. ‘ब्रह्मोत्सवा’च्या वेळी (टीप २) आपण सर्वांनी नारायणांचे दर्शन घेतले असून तेच हिंदु राष्ट्र आणणार आहेत.
टीप २ : महर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव ‘ब्रह्मोत्सवा’च्या रूपात साजरा करण्यात आला.
१ उ. हिंदु राष्ट्रामध्ये आपल्याला सगळ्या सेवा करायच्या आहेत. हिंदु राष्ट्रासाठी केलेली सेवा ही नारायणांचीच सेवा आहे.
१ ऊ. आपली साधना आणि सेवा पूर्ण झाल्यावर आपला पुढील प्रवास घराच्या दिशेने एकट्याचा (म्हणजे मायेतील प्रवास) न रहाता आपण नेहमीसाठी आश्रमातच (जन्म-मृत्यू यांच्या फेर्यांतून मुक्त होऊन) रहाणार आहोत.
१ ए. नारायणांना बघून बालसाधकांचा भाव जागृत होतो. हिंदु राष्ट्रात हे सर्व दैवी बालसाधक असतील.
१ ऐ. हिंदु राष्ट्र आल्यामुळे आपण सर्व जण पुष्कळ आनंदी आणि भावस्थितीत असणार आहोत.
‘हे सर्व मला नारायणांनीच सांगितले’, त्यासाठी त्यांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता.’
– पू. वामन राजंदेकर (सनातनचे दुसरे बालसंत, वय ४ वर्षे), फोंडा, गोवा. (१४.६.२०२३)