नागपूर येथे १ मासाच्या बाळाची हत्या केल्याप्रकरणी आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा !

शहरातील साळी येथील अवघ्या १ मासाच्या बाळाची चाकूने भोसकून हत्या करणार्‍या क्रूरकर्मा आरोपी गणेश बोरकर (वय ४० वर्षे) याला जिल्हा सत्र न्यायाधीश एस्.एम्. अली यांनी २४ मे या दिवशी आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

जुलैमध्ये प्रदर्शित होणार ‘अजमेर ९२’ चित्रपट !

‘द केरल स्टोरी’ या चित्रपटांतून हिंदूंवरील धर्मांध अन् जिहादी आतंकवाद्यांचे अत्याचार जगासमोर आणल्यानंतर आता ‘अजमेर ९२’ हा चित्रपट येत्या जुलै मासामध्ये प्रदर्शित होणार आहे.

नागपूर येथील ४ मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार वस्त्रसंहिता लागू ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ

मंदिराचे पावित्र्य टिकवण्यासाठी तेथे वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेणार्‍या देवस्थानांचे अभिनंदन. असा निर्णय भारताचील सर्वत्रच्या मंदिरांनी घेणे आवश्यक !

छत्रपती संभाजीनगर येथे गोवंशियांच्या वाहतुकीचा ट्रक अडवणार्‍या भाजप कार्यकर्त्यावर धर्मांधांचे जीवघेणे आक्रमण !

कत्तलीच्या उद्देशाने गोवंशियांची वाहतूक केली जात असल्याच्या संशयावरून ट्रक अडवणारे भाजपचे कार्यकर्ते कुणाल खरात यांच्यावर चाकू आणि तलवारी यांनी जीवघेणे आक्रमण करण्यात आले.

पोलीस शिपायाची पोलीस दलातून कायमची हकालपट्टी !

उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांच्या बंगल्यातून न्यायाधिशांचे चारचाकी वाहन काढून शहरात फेरफटका मारल्याप्रकरणी पोलीस शिपाई अमित झिल्पे याची पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस दलातून थेट हकालपट्टी केली आहे.

‘लव्ह जिहाद’चे समर्थन करत असल्यावरून बजरंग दलाचा ‘द क्रिएटर : सृजनहार’ चित्रपटाला विरोध

हिंदूंवरील आघातांविषयीचा कुणी चित्रपट काढला, तर त्याला पुरो(अधो)गामी आणि ढोंगी निधर्मीवादी विरोध करतात; मात्र ‘लव्ह जिहाद’चे समर्थन कुणी करत असेल, तेव्हा हे सर्व जण मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !

ब्रिटनचे पंतप्रधान सुनक यांच्या सरकारी घराच्या फाटकाला चारचाकी वाहनाची धडक !

पोलिसांनी वेळीच धाव घेत आरोपी चालकाला अटक केली. आरोपीने हे कृत्य जाणीवपूर्वक केले आहे का ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेत कुणी घायाळ झालेले नाही.

पाकिस्तानी सैन्याच्या प्रतिष्ठानांवरील आक्रमणांना सरकारचीच चिथावणी !

गृह मंत्रालयाच्या निर्देशांनुसार तोडफोड आणि सैन्याच्या मालमत्तेला हानी पोचवण्यासाठी गुप्तचर खात्याने सरकार समर्थकांना चिथावणी दिली होती. हा अहवाल सैन्याच्या गुप्तचर विभागाने सिद्ध केला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्याप्रकरणी ४ हिंदु तरुणांवर गुन्हा नोंद !

अफझलखान आणि औरंगजेब यांना आदर्श मानणारे देशात मोठ्या प्रमाणात असणे, हे हिंदूंचे दुर्दैवच होय !

आग्रा येथे २ सहस्र रुपयांच्या बनावट नोटा जप्त

हर्षल नावाचा व्यावसायिक २ कोटी ८५ लाख रुपये जमा करण्यासाठी बँकेत गेला होता. यामध्ये २ सहस्र रुपयांच्या काही नोटा बनावट होत्या.