पाकिस्तानी सैन्याच्या प्रतिष्ठानांवरील आक्रमणांना सरकारचीच चिथावणी !

पाकिस्तानी सैन्याच्या गुप्तचर विभागाचा गौप्यस्फोट !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ९ मे या दिवशी झालेल्या अटकेनंतर उसळलेला हिंसाचार थांबलेला नाही. या वेळी सैन्यदलप्रमुख जनरल आसिम मुनीर यांना सोपवलेल्या एका अहवालात शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. या अहवालानुसार खान यांच्या अटकेनंतर सैनिकी प्रतिष्ठानांमध्ये तोडफोड आणि आक्रमणे करण्यात आली. या कृत्यांत सरकारही सहभागी होते. गृह मंत्रालयाच्या निर्देशांनुसार तोडफोड आणि सैन्याच्या मालमत्तेला हानी पोचवण्यासाठी गुप्तचर खात्याने सरकार समर्थकांना चिथावणी दिली होती. हा अहवाल सैन्याच्या गुप्तचर विभागाने सिद्ध केला आहे.

शाहबाज शरीफ व जनरल आसिम मुनीर

संपादकीय भूमिका

या अहवालाचे निमित्त सैन्याने पाकमधील शहबाझ शरीफ सरकारही उलथवून लावल्यास आश्‍चर्य वाटायला नको !