धर्मांधांची उलट खोटी तक्रार !
छत्रपती संभाजीनगर – कत्तलीच्या उद्देशाने गोवंशियांची वाहतूक केली जात असल्याच्या संशयावरून ट्रक अडवणारे भाजपचे कार्यकर्ते कुणाल खरात यांच्यावर चाकू आणि तलवारी यांनी जीवघेणे आक्रमण करण्यात आले. २५ मे या दिवशी सावंगी बायपास रस्त्यावर सकाळी ७ वाजता ही घटना घडली. या प्रकरणी एम्.आय.डी.सी. सिडको पोलीस ठाण्यात आरोपी फैजल खान फिरोज खान, राजा कुरेश, सोहेल कुरेशी यांच्यासह ३० ते ३५ धर्मांधांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बंदुकीचा धाक दाखवून ट्रक अडवत १५ ते २० जणांना दांडे आणि लोखंडी रॉड यांनी मारहाण केली आहे, अशी खोटी तक्रार फैजल खान फिरोज खान यांनी दिली असून यावरूनही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एक ट्रक गोवंशियांना घेऊन शहरात येत असल्याची माहिती मिळाली होती. याविषयी भाजपच्या कार्यकर्त्याने पोलिसांना ११२ क्रमांकावरून माहिती दिली, तसेच ते केंब्रिजकडून सावंगी बायपासकडे जात असतांना गोवंश घेऊन जाणारा ट्रक त्यांना उभा दिसला. या वेळी ट्रकचालकाला गाडीत असलेल्या गोवंशियांविषयी विचारणा करण्यात आली. याच वेळी घटनास्थळी ३० ते ३५ धर्मांध आले. ‘हा नेहमी आपली गाडी अडवतो’, असे म्हणत अनोळखी लोकांनी खरात यांच्यावर शस्त्रांनी आक्रमण केले. त्यामुळे खरात यांच्यासमवेत असलेल्या त्यांच्या मित्रांनी आरडाओरडा केला. त्यानंतर मारहाण करणारे धर्मांध पळून गेले, तर यात गंभीर घायाळ झालेल्या खरात यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले.
संपादकीय भूमिकागोतस्कर आणि धर्मांध यांचा उद्दामपणा वाढत असल्याचे हे लक्षण आहे. गोतस्कर आणि धर्मांध यांवर जरब बसेल, अशी कारवाई पोलीस कधी करणार ? गोवंश हत्याबंदी कायद्याची कार्यवाही कठोरपणे करण्याची आवश्यकता आहे. |