मंदिरांच्या विकासासाठी रत्नागिरी जिल्ह्याला गेल्या ५ वर्षांमध्ये साडेदहा कोटी रुपये संमत !

पर्यटनाला चालना मिळण्याचा मानस ! केवळ पर्यटनाला चालना मिळण्यासाठी नव्हे, तर प्रत्येकाला आध्यात्मिक लाभ होईल, या दृष्टीने मंदिरांचा विकास व्हायला हवा !

दाभोळ खाडीतील जलमार्गाला राष्ट्रीय जलमार्ग म्हणून संमती !

भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणाने राष्ट्रीय जलमार्ग अधिनियम २०१६ द्वारा दाभोळ खाडीचा राष्ट्रीय जलमार्ग म्हणून समावेश केला आहे. या मार्गाला राष्ट्रीय जलमार्ग २८ म्हणून ओळखले जाईल.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे राष्ट्र आणि धर्म यांचे विचार आपण पुढील पिढीला दिले पाहिजेत ! – प.पू. काडसिद्धेश्वर स्वामी, कणेरी मठ, कोल्हापूर

सावरकर घराण्यातील यशोदाबाई गणेश सावरकर, यमुनाबाई विनायक सावरकर आणि शांताबाई नारायण सावरकर या तिघींनी काय हालअपेष्टा सोसल्या ? ते पाहून अनेकांचे डोळे पाणावले.

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतून वीर सावरकर यांच्या विचारांचे जागरण

सावरकरांनी जातींमध्ये विभागलेला हिंदु समाज एक होण्यासाठी केलेले कार्य, अंदमानात सहन केलेल्या हालअपेष्टा, रत्नागिरीत केलेले सामाजिक कार्य, विज्ञान विचार, नाट्य, साहित्य लेखन याविषयी स्पर्धकांनी विचार मांडले.

पाकिस्तानच्या कारागृहात इस्लामिक स्टेटशी संबंध असलेल्या केरळमधील मुसलमानाचा मृत्यू

‘द केरल स्टोरी’ चित्रपटातील सत्य घटनांना खोटे ठरवणारे याविषयी बोलतील का ?

ऑस्ट्रेलियात मंदिरांवरील आक्रमणे खपवून घेतली जाणार नाहीत ! – ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज

यापूर्वी ऑस्ट्रेलियात हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे झाल्यावर ती रोखण्याचे आश्‍वासन ऑस्ट्रेलियाने दिले होते; मात्र त्यानंतरही आक्रमणे चालू आहेत. त्यामुळे अशा आश्‍वासनांवर किती विश्‍वास ठेवायचा ?, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उमटणारच !

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना ठार मारण्याच्या उद्देशाने धमकावणार्‍या भारतीय वंशाच्या युवकाला अटक !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना एका भारतीय वंशाच्या अमेरिकी युवकाने जिवे मारण्याची धमकी दिली आहे. साई वर्षित कंदुला असे या १९ वर्षीय युवकाचे नाव असून त्याने थेट एक ट्रकच व्हाईट हाऊसच्या संरक्षणात्मक अडथळ्यांवर (‘सेक्युरिटी बॅरिअर्स’वर) चढवला.

वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांची नावे मतदार सूचीमध्ये येण्यासाठी सरकार नवीन पद्धत आणणार ! – अमित शहा

वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांची नावे मतदार सूचीमध्ये येण्याकरता प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. ही प्रक्रिया सुलभ व्हावी याकरता केंद्र सरकार एक नवी पद्धत आणणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.

इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनामुळे ९ सहस्र महिला अटकेत !

इराणमध्ये हिजाबच्या विरोधात गेल्या ९ मासांपासून आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनाच्या प्रकरणी ९ सहस्र महिलांना अटक करून कारागृहात डांबण्यात आले आहे, तर ५०० जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

गोव्यात होणार्‍या ‘सी-२०’ परिषदेच्या माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रकाशन !

या प्रकाशनानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेले विविध आध्यात्मिक संशोधन आणि देश-विदेशांतील कार्य यांविषयी जाणून घेत या कार्याचे कौतुक केले.