पणजी, २५ मे (वार्ता.) – गोव्यातील वास्को येथे २७ मे या दिवशी प्रथमच होणार्या ‘सी-२०’ परिषदेच्या माहिती पुस्तिकेचे गोवा राज्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पणजी येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी प्रकाशन करण्यात आले. या वेळी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संशोधन समन्वयक सौ. श्वेता, डॉ.(सौ.) अमृता देशमाने आणि व्यावसायिक श्री. नारायण नाडकर्णी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या पणजी येथील शासकीय निवासस्थानी आंतरराष्ट्रीय ‘जी-२०’साठी स्वतंत्र कक्ष सिद्ध करण्यात आला आहे. या कक्षातच ‘सी-२०’ परिषदेच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या ‘सी-२०’ परिषदेचे आयोजन गोवा सरकार, ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’, ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडिज’ आणि ‘भारतीय विद्या भवन, नवी देहली’ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
२७ मे या दिवशी ‘विविधता, सर्वसमावेशकता आणि परस्पर आदर’ या विषयावर ‘सी-२०’ची परिषद वास्को येथे होणार आहे. यात गोव्यासह देश-विदेशांतील मान्यवर वक्ते विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
Chief Minister,@DrPramodPSawant launched the event brochure of Civil 20 India,2023 working Group at Altinho.
C20 International Summit organised by Maharshi Adhyatma Vishwavidyalay (MAV),incollaboration with the International Center of Cultural Studies (ICCS) and…1/2 pic.twitter.com/699n2dxx3N— DIP Goa (@dip_goa) May 25, 2023
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे प्रसिद्धीपत्रक !
या प्रकाशनानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेले विविध आध्यात्मिक संशोधन आणि देश-विदेशांतील कार्य यांविषयी जाणून घेत या कार्याचे कौतुक केले.