वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांची नावे मतदार सूचीमध्ये येण्यासाठी सरकार नवीन पद्धत आणणार ! – अमित शहा

नवी देहली – वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांची नावे मतदार सूचीमध्ये येण्याकरता प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. ही प्रक्रिया सुलभ व्हावी याकरता केंद्र सरकार एक नवी पद्धत आणणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. शहा यांनी जनगणना भवनाचे उद्घाटन केले. त्या वेळी ते बोलत होते.

अमित शहा यांनी सांगितले की, निवडणूक आयोग संबंधित व्यक्तीची अनुमती घेऊन त्याचे मतदानकार्ड सिद्ध करणार आहे. एखाद्याचे निधन झाल्यास संबंधिताचे नाव मतदार सूचीतून काढून टाकणार आहे.