उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी जी-२० परिषदेत व्यक्त केला विश्‍वास !

  • जम्मू-काश्मीरचा लवकरच जगातील पहिल्या ५० पर्यटनस्थळांत  समावेश होणार !
  • चीन, सौदी अरेबिया, तुर्किये, इंडोनेशिया आणि इजिप्त यांचा सहभाग नाही !
डावीकडून तिसऱ्यास्थानी उपराज्यपाल मनोज सिन्हा

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) –  जम्मू आणि काश्मीर लवकरच जगातील पहिल्या ५० पर्यटनस्थळांमध्ये स्थान मिळवेल, असा विश्‍वास जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी व्यक्त केला. श्रीनगरमध्ये जी-२० च्या अंतर्गत पर्यटन कार्यगटाची बैठक नुकतीच पार पडली. त्यामध्ये सिन्हा बोलत होते. या बैठकीला चीन, सौदी अरेबिया, तुर्किये, इंडोनेशिया आणि इजिप्त या देशांनी सहभाग घेतला नाही.

संपादकीय भूमिका 

जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे ३७० कलम रहित केल्याने इस्लामी देशांचे काश्मीरला इस्लामी राष्ट्र बनवण्याचे स्वप्न भंगल्यानेच त्यांनी याकडे पाठ फिरवली, हे लक्षात घ्या ! यातून इस्लामी देशांना जागतिक स्तरावरील संघटनापेक्षा त्यांचा धर्म अधिक महत्त्वाचा वाटतो, हेच लक्षात येते. याविषयी कथित धर्मनिरपेक्षतावादी याविषयी गप्प का ?