उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी जी-२० परिषदेत व्यक्त केला विश्‍वास !

जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे ३७० कलम रहित केल्याने इस्लामी देशांचे काश्मीरला इस्लामी राष्ट्र बनवण्याचे स्वप्न भंगल्यानेच त्यांनी याकडे पाठ फिरवली, हे लक्षात घ्या !

उत्तराखंडमध्ये आतापर्यंत ४२९ अवैध मजारी उद्ध्वस्त !

अवैध मजारी बांधण्यात येईपर्यंत प्रशासन झोपले होते ? याला उत्तरदायी अधिकार्‍यांवरही कारवाई झाली पाहिजे !

गोव्यात २ सहस्र रुपयांच्या नोटा पालटून देण्याच्या अधिसूचनेला अधिकोषांकडून हरताळ

‘रिझर्व्ह बँके’ने जरी अधिसूचना काढलेली असली, तरी ती अधिसूचना केवळ ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’लाच यांनाच लागू आहे आणि इतर अधिकोषांना ती लागू नाही’, अशी उडवाउडवीची उत्तरे अधिकोषांतील काही अधिकारी देत आहेत.

मांद्रे, पेडणे येथे ‘धनुष्य आणि बाण’ यांची भव्य प्रतिकृती उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे, गोवा

गोव्यात काणकोण येथे श्री परशुराम मंदिर सोडल्यास अन्य कुठेही भगवान परशुराम यांच्याशी निगडित वास्तू नाही. यामुळे आम्ही भगवान परशुराम यांचे प्रतीक असलेले ‘धनुष्य आणि बाण’ यांची प्रतिकृती उभारणार आहोत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग २० वर्षे अपघातविरहित सेवा बजावलेल्या चालकांचा सत्कार

‘चालक’ या शब्दामध्ये ‘लक’ म्हणजे भाग्य आहे आणि ‘नियम’ या शब्दात ‘यम’ आहे, हे नेहमी लक्षात ठेवा आणि वाहन चालवा, असे आवाहन ब्रह्माकुमारी संस्थेच्या शोभा बेहेनजी यांनी या वेळी चालकांना केले.

जैवविविधता नोंदणी पुस्तिकेचे अद्ययावतीकरण आणि पडताळणी या राष्ट्रीय मोहिमेचा गोव्यात प्रारंभ

‘‘निसर्गातील नाजूक समतोल राखणे  महत्त्वाचे आहे. एखाद्याने निसर्गाकडून जितके घेतले आहे, तेवढे परत केले पाहिजे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जैवविविधतेचे संवर्धन ही गुरुकिल्ली आहे.’’

पुणे येथील व्यावसायिक अभय संचेती यांच्याकडून ३५ गायींचे संगोपन !

समाजातील प्रत्येक व्यक्तीने गायीची सेवा केली पाहिजे, या उदात्त हेतूने ‘ओम् गुरु आनंद गोशाळे’च्या माध्यमातून ३५ गायींचे संगोपन करण्यात येत आहे. मार्केट यार्ड येथे रहाणारे व्यावसायिक अभय संचेती आणि त्यांचे कुटुंबीय हे सेवाकार्य गेल्या १० वर्षांपासून करत आहेत.

रांगणा गडाच्या (जिल्हा कोल्हापूर) पायथ्याशी होणार्या डांबरी रस्त्याला विरोध !

हा रस्ता कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्त्वाच्या रांगणा गडाच्या पायथ्यापर्यंत जाणार आहे. हा रस्ता झाल्यास तेथील वन्यजीवनावर विपरित परिणाम होईल, असे कार्यकर्त्यांना वाटते.

सरकारी शाळांमध्ये ‘एक रंग – एक गणवेश’ हे धोरण लागू होणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये ‘एक रंग – एक गणवेश’ हे धोरण नव्या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.

हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

‘भारतातील हिंदू स्वतःचे आणि सरकार हिंदूंचे रक्षण करू शकत नाहीत. असे हिंदू आणि सरकार पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका येथील हिंदूंचे कधी रक्षण करू शकेल का ? हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्रच हवे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले