पाकिस्तानच्या कारागृहात इस्लामिक स्टेटशी संबंध असलेल्या केरळमधील मुसलमानाचा मृत्यू

पाकिस्तान मृतदेह भारताकडे सोपवणार

डावीकडून झुल्फिकार आणि त्याचे वडील अब्दुल हमीद

कराची (पाकिस्तान) – येथील कारागृहात अटकेत असणारा केरळच्या पलक्कडमधील झुल्फिकार (वय ४८ वर्षे) याचा मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह भारताकडे सोपवण्यात येणार आहे. झुल्फिकारला पाकिस्तानच्या समुद्री सीमेमध्ये घुसखोरी केल्यावरून मासेमार्‍यांसमवेत अटक करण्यात आली होती. त्याचा संबंध इस्लामिक स्टेटशी असल्याची माहिती मिळाली होती. तो पूर्वी संयुक्त अरब अमिरातमध्ये रहात होता. त्याचे संबंध इस्लामिक स्टेटशी असल्याची माहिती मिळाल्यावर त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. तसेच त्याच्या केरळमधील नातेवाइकांनीही संबंध तोडले होते. आता पाककडून झुल्फिकारचा मृतदेह भारताकडे सोपवण्यात येत असल्याने त्याचे नातेवाईक मृतदेह स्वीकारण्यास सिद्ध झाले आहेत.

संपादकीय भूमिका 

‘द केरल स्टोरी’ चित्रपटातील सत्य घटनांना खोटे ठरवणारे याविषयी बोलतील का ?