सातारा येथे हिंदु जनजागृती समिती आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने राजलक्ष्मी चित्रपटगृहाबाहेर युवतींचे प्रबोधन !

हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी पाहू नका, तर तुम्ही स्वत: जागृत व्हा आणि इतरांनाही जागृत करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समिती आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. 

अमरावती येथे ‘हिंदू एकता दिंडी’ उत्साहात पार पडली !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त देशभरात ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत अंबानगरी अमरावती येथे भव्य ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली.

मुंबई येथे हिंदू एकता दिंडीत हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय यांच्यातील हिंदू ऐक्याचे दर्शन !

२० संघटनांचे १ सहस्राहून अधिक हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग !

हिंदूंनाे, हे लक्षात घ्या !

‘व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली राजकारण्याविषयी कुणी अर्वाच्च बोलू शकत नाही; पण देवतांविषयी बोलतात ! आपल्याला हे पालटायचे आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे घुसखोरी करू पहाणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – राष्ट्रीय वारकरी परिषद

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे घुसखोरी करू पहाणारे आणि राज्यात ठिकठिकाणी शोभायात्रांवर आक्रमणे करणारे दंगलखोर यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे आवाहन राष्ट्रीय वारकरी परिषदेने एका पत्रकाद्वारे केले आहे.

#Exclusive : १ लाख लोकसंख्येहून अल्प असलेल्या गावांतही सावरकर यांचा परिचय करून द्यायला हवा ! – श्रीकांत ताम्हणकर, सावरकर अभ्यासक, पुणे

२१ ते २८ मे २०२३ या कालावधीत सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही ‘शतपैलू सावरकर’ ही वृत्तमालिका चालू करत आहोत. या माध्यमातून सावरकर यांच्या जीवनप्रवासातील विविधांगी पैलू उलगडण्यास, तसेच युवा पिढीमध्ये जाज्ज्वल्य राष्ट्राभिमान निर्माण होण्यास साहाय्य होईल.

(म्हणे) ‘नगर येथे काही शक्ती धर्माच्या नावाने दंगली करत आहेत !’ – शरद पवार

शेवगाव येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने निघालेल्या मिरवणुकीवर धर्मांधांनी दगडफेक करून दंगल केली. असे असतांना पवार त्यांचे नेहमीचे ‘खोटे बोल पण रेटून बोल’ हा प्रकार काही थांबवत नाहीत !

सी.बी.एस्.ई.च्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षांमध्ये झारखंड येथील सनातनच्या साधकांचे सुयश

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचा निकाल लागला आहे. या परीक्षांमध्ये सनातनच्या साधकांनी सुयश प्राप्त केले आहे.

दुर्लक्षिलेले ‘अजमेर सेक्स स्कँडल’ !

हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे अजमेर दर्ग्याचे तत्कालीन खादिम आणि काँग्रेसी यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

चकमक तज्ञ दया नायक पुन्हा मुंबई गुन्हे शाखेत रुजू !

महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकात कार्यरत असणारे पोलीस अधिकारी दया नायक यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत घेण्यात आले आहे. चकमक तज्ञ (‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट’) म्हणून ओळख असणारे नायक यांनी स्वतःच ट्वीट करून ही माहिती दिली.