नवरी मिळेना नवर्‍याला !

सर्वच स्तरावर शेतीप्रधान भारतामध्ये शेतीचे महत्त्व सर्वांवर बिंबवायला हवे. कोरोना महामारीच्या काळात जर पाहिले, तर सर्व प्रकारचे उद्योग बंद पडले; मात्र शेती हा व्यवसाय बंद पडला नाही. त्यामुळे या व्यवसायाकडे सकारात्मक दृष्टीने पहाण्याची नितांत आवश्यकता आहे.

बंगालमधील हुकूमशाही जाणा !

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही बंगालमध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर अवैधरित्या बंदी घालण्यात आली आहे. चित्रपटगृहांच्या मालकांना पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून धमक्या येत आहेत, असा आरोप चित्रपटाचे निर्माते विपुल शहा यांनी केला.

‘ॲफिडेव्हिट’ (प्रतिज्ञापत्र) म्हणजे काय ?

‘ॲफिडेव्हिट’ हा शब्द सध्या फारच परिचयाचा झालेला आहे. न्यायालय, शैक्षणिक संस्था, प्रवेश घेणे, प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे अथवा कोणत्याही सरकारी-निमसरकारी कार्यालयात ‘ॲफिडेव्हिट’ सादर करणे बंधनकारक असते. कायद्याच्या म्हणजेच ‘नागरी प्रक्रिया संहिते’च्या (‘सीपीसी’च्या) पुस्तकात कुठेही ‘ॲफिडेव्हिट’ हा शब्द आलेला नाही.

शौर्याचे शिखर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर !

जिवंत असतांना एखाद्या माणसाला प्रेताच्या तिरडीवर चढवले, तर काय वाटेल हो त्याला ? स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अंदमानला नेत होते, तेव्हा नेमकी हीच भावना होती त्यांच्या मनात ! जन्मठेपेची कहाणी सांगतांना सावरकर लिहितात, ‘‘आम्ही कैदी कोलकात्याहून निघालो, तेव्हा अनेक जण आम्हाला कायमचा निरोप देत होते.

रात्री वेळेत झोप येत नसल्यास दुपारची झोप टाळावी !

‘रात्री झोपायला गेल्यावर झोप न लागणे, ही समस्या अनेकांना असते. बहुतेक वेळा दुपारी झोपल्याने रात्री लवकर झोप लागत नाही. त्यामुळे रात्री वेळेत झोप येण्यासाठी दुपारची झोप टाळावी.’

धर्मांधांचा त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथील मंदिरात प्रवेश आणि हिंदूंचा निद्रिस्तपणा !

‘नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाचे मंदिर आहे. १३.५.२०२३ या दिवशी तेथील ‘शिवपिंडीवर हिरवी चादर चढवायची आहे’, म्हणून काही धर्मांधांनी मंदिराच्या उत्तर दारातून बलपूर्वक गर्भागृहात घुसण्याचा प्रयत्न केला.

राणा प्रतापसिंहाचा जन्म !

प्रताप खरे योद्धे होते. त्यांच्या शौर्याची वाहवा प्रत्यक्ष शत्रूही करत. त्यांचा स्वधर्म, स्वदेश आणि स्वकुळ यासंबंधीचा अभिमान तर सूर्याइतका तेजस्वी अन् प्रखर होता. अकबराशी युद्ध करण्यात दाखवलेले शौर्य अलौकिक होते.

समीर वानखेडे यांची ५ घंटे चौकशी !

आर्यन खान याच्या अटकेच्या प्रकरणात २५ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआयने) सलग दुसर्‍या दिवशी तत्कालीन अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एन्.सी.बी.चे) आणि आय.आर्.एस्. अधिकारी समीर वानखेडे यांची ५ घंटे चौकशी केली.

महिलांचे अधिकार आणि सन्मान यांच्यासाठी राष्ट्रीय पातळीवर लढा उभारणार ! – डॉ. भारती चव्हाण, अध्यक्षा, मानिनी फाऊंडेशन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी महिला बालकल्याण विभागासाठी २५ सहस्र ४४९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. केंद्र सरकारने महिला सक्षमीकरणासाठी घेतलेल्या पुढाकाराविषयी आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. 

श्री गणेशचतुर्थीच्या काळात गावाला जाण्यास इच्छुक असणार्‍यांनी रेल्वे तिकिटाचे त्वरित आरक्षण करावे ! 

साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !