सी.बी.एस्.ई.च्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षांमध्ये झारखंड येथील सनातनच्या साधकांचे सुयश

धनबाद (झारखंड) – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचा निकाल लागला आहे. या परीक्षेमध्ये बोकारो येथील चिन्मया विद्यालयामध्ये शिकणारी सनातनची साधिका कु. हर्षिता रणजीतकुमार सिंह हिने १० वीमध्ये ९४.६ टक्के, तर धनबाद येथील कु. प्रज्ञा चौरसिया हिने १० मध्ये ८०.८ टक्के गुण प्राप्त केले. कतरास येथील सनातनची साधिका कु. मौली केशरी हिने १२ वीमध्ये ८५ टक्के, रांची येथील हित चौहान याला १२ वीमध्ये ७९ टक्के, तर कु. अदिती केशरी हिला ९० टक्के गुण प्राप्त झाले आहेत.