भारतातील ‘लव्‍ह जिहाद’च्‍या षड्‍यंत्राची माहिती अमेरिकी दूतावासाने अमेरिकेच्‍या ‘सेक्रेटरी ऑफ स्‍टेट्‍स’ला पाठवल्‍याचा ‘विकीलिक्‍स’ने केलेला खुलासा !

प्रतिकात्मक छायाचित्र

‘भारतातील अमेरिकेच्‍या दूतावासातील अधिकारी वर्ग प्रतिदिन भारतातील महत्त्वपूर्ण घडामोडींविषयी अमेरिकेच्‍या ‘सेक्रेटरी ऑफ स्‍टेट्‍स’च्‍या कार्यालयात माहिती पाठवतात. ही माहिती पूर्णतः गोपनीय असते आणि त्‍या माहितीच्‍या आधारे अमेरिकेची भारतनीती ठरते. भारतातील अमेरिकी अधिकार्‍यांना येथे ‘लव्‍ह जिहाद’ हे षड्‍यंत्र रचनले जात असल्‍याची जाणीव झाल्‍यानंतर २६.२.२०११ या दिवशी अमेरिकेच्‍या चेन्‍नईस्‍थित अमेरिकी दूतावासाने भारतातील ‘लव्‍ह जिहाद’च्‍या कटाची माहिती देणारी काही कागदपत्रे पाठवली होती. तेव्‍हा ज्‍युलीयन अंसाजे संपादक असलेल्‍या ‘विकीलिक्‍स’ या संकेतस्‍थळाने ही कागदपत्रे अमेरिकी संगणक ‘हॅक’ करून ती चोरली आणि नंतर ‘विकीलिक्‍स’ संकेतस्‍थळावर ती उघड केली. या कागदपत्रांतील काही अंश –

‘मुसलमानांनी आता शुद्ध जिहाद आणि गुप्‍त जिहाद यांच्‍यासह ‘लव्‍ह जिहाद’ हे नवे षड्‍यंत्र आखले आहे. ‘लव्‍ह जिहाद’मध्‍ये कोणतेही प्रेमतत्त्व नाही; पण काफिरांविषयी घृणाभाव आहे. मुसलमानेतर भोळ्‍या तरुणींना प्रेमजालात फसवून त्‍यांचे इस्‍लामीकरण करणे आणि त्‍यांच्‍याकडून जघन्‍य कुकर्म करवून घेणे, असे हे षड्‍यंत्र आहे.’

(साभार : मासिक ‘तरुण हिंदु)


श्रीकृष्‍णाने १६ सहस्र राजकन्‍यांशी विवाह केल्‍याच्‍या घटनेचा विपर्यस्‍त अर्थ लावणारे ‘लव्‍ह जिहाद’विषयी बोलायला मात्र सिद्ध नाहीत !

‘द्वापरयुगात श्रीकृष्‍णाने १६ सहस्र राजकन्‍यांना नरकासुराच्‍या तावडीतून सोडवले. या घटनेतून भगवान श्रीकृष्‍णाने ‘पीडित असलेल्‍या कुठल्‍याही स्रीचे रक्षण करून तिला त्रास देणार्‍याला योग्‍य ती अद्दल घडवावी, असा महान संदेश दिला आहे; मात्र आज काही लोक या घटनेचा विपर्यास करून भगवान श्रीकृष्‍णाबद्दल चुकीचा संदेश पसरवत आहेत. हेच लोक ‘लव्‍ह जिहाद’ने त्रासलेल्‍या एकाही हिंदु युवतीबद्दल काहीही बोलायला सिद्ध नाहीत.’

– ह.भ.प. चारुदत्त आफळे, राष्‍ट्रीय प्रवचनकार

‘लव्‍ह जिहाद’मागील दुहेरी उद्देश !

‘लव्‍ह जिहाद’चा एक उद्देश मुसलमान समुहाची लोकसंख्‍या वाढवणे हा आहे; मात्र केवळ देशात मुसलमान समूहाची लोकसंख्‍या वाढवणे, एवढाच उद्देश यामागे नसून आतंकवादी कृत्‍यांची आखणी करण्‍यासाठीही ‘लव्‍ह जिहाद’चा वापर होत आहे. ‘लव्‍ह जिहाद’ ही केवळ हिंदु समाजालाच भेडसावणारी समस्‍या नसून संपूर्ण जगच जिहादी मूलतत्त्ववाद्यांच्‍या समस्‍येने ग्रस्‍त आहे.

– श्री. सच्‍चिदानंद हेगडे, ‘सोंडा स्‍वर्णपल्‍ली संस्‍थान’चे प्रतिनिधी, शिरसी, कर्नाटक.

‘लव्‍ह जिहाद’चे तंत्र !

काफिर स्‍त्रियांना फसवून, त्‍यांचा दुरुपयोग करून स्‍वतःची लोकसंख्‍या वाढवणे, हेही ‘युद्ध आणि पवित्र’ असते. यालाच ‘लव्‍ह जिहाद’ असे नाव पडले आहे. मूर्ख काफीर मुलींना मोहपाशात अडकवून, आर्थिक सुबत्तेचे आणि लग्‍नाचे आमीष दाखवून, त्‍यांचा भोगवस्‍तू म्‍हणून वापर करायचा, त्‍यांचे बळजोरीने धर्मांतर करायचे आणि मग त्‍यांना घरातील कोंडवाड्यात नाहीतर बाजारातील उकिरड्यावर बसवायचे, हे या ‘लव्‍ह जिहाद’चे तंत्र !

– डॉ. श्रीरंग गोडबोले, पुणे

(साप्‍ताहिक विवेक)