गड-दुर्ग रक्षणाच्‍या कार्यात कसे सहभागी व्‍हाल ?

• गड-दुर्गांची दुरवस्‍था रोखण्‍यासाठी आंदोलनात सहभाग घ्‍या !

• गड-दुर्गाच्‍या संवर्धनासाठी आयोजित केलेल्‍या एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्‍हा !

• गड-दुर्गांसाठी सामाजिक प्रसिद्धीमाध्‍यमांद्वारे जनजागृती करा !

• गड-दुर्गांविषयी सरकारला निवेदन देणे, पोलीस तक्रारी करणे आदींमध्‍ये सहभाग घ्‍या !

• माहिती अधिकार किंवा कायद्याच्‍या संदर्भातील सूत्रांमध्‍ये साहाय्‍य करा !

दुर्ग पर्यटन करणार्‍यांनो…!

पर्यटकांनो, गडावर आपला दैदिप्‍यमान इतिहास अनुभवण्‍यासाठी जा. तेथे जाऊन केवळ छायाचित्रे किंवा ‘सेल्‍फी’ (स्‍वतःच स्‍वतःचे काढलेले छायाचित्र) काढण्‍यात वेळ न घालवता गड-दुर्ग यांचे ऐतिहासिक महत्त्व समजून घ्‍या. गडाच्‍या रक्षणकार्यात हातभार लावा !