शेवटच्‍या क्षणापर्यंत श्रीरामांच्‍या समवेत सावलीसारखा राहून ‘रामसेवा’ हाच संसार करणारा लक्ष्मण !

राम हा सूर्य आहे. सूर्याकडे म्‍हणजे तेजाकडे पहाणे सोपे नाही; म्‍हणून एकदम रामाच्‍या तेजाला सामोरे न जाता लक्ष्मणाच्‍या ओळखीने प्रभु श्रीरामाची ओळख करून देणार आहे.

साधकांनो, ‘समर्पणभाव’ वाढवून श्रीरामस्‍वरूप गुरूंच्‍या अवतारी कार्यात स्‍वतःला झोकून द्या आणि त्‍यांचे आज्ञापालन करून स्‍वतःचा उद्धार करून घ्‍या !

‘आपण भगवद़्‍कार्यात स्‍वतःला झोकून दिल्‍यास भगवंतालाच सर्वार्थांनी आपला उत्‍कर्ष करण्‍याची तळमळ लागते. तोच सर्वार्थांनी भार वाहून आपला उद्धार करतो. तो भक्‍तीसारखी अनमोल गोष्‍ट भक्‍ताला सहजतेने प्रदान करतो.’…..

आजचा वाढदिवस : श्री. पुंडलिक माळी

‘चैत्र शुक्‍ल नवमी (रामनवमी) (३०.३.२०२३) या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमातील श्री. पुंडलिक माळी यांचा ६८ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांच्‍या मुलीला जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

श्रीरामनवमीच्‍या कालावधीत घेतलेल्‍या भावजागृतीच्‍या प्रयोगांतून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

साधिकांनी घेतलेले भावजागृतीचे प्रयोग अनुभवतांना ‘भावजागृती होत आहे आणि चैतन्‍य, आनंद अन् शांतीही मिळत आहे’, असे मला जाणवले. ज्‍या वेळी भावजागृती व्‍हायची, त्‍या वेळी असे वाटायचे, ‘देव आपल्‍यासाठी किती करत आहे ?…..

देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमातील ६२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सुश्री (कु.) महानंदा पाटील यांना श्रीरामाच्‍या संदर्भात आलेल्‍या विविध अनुभूती

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील श्रीरामाच्‍या चित्राकडे एकटक पहाणे आणि ‘निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता’, हे वाक्‍य उच्‍चारल्‍यावर चेहर्‍यावरील काळे आवरण दूर झाले’, असे जाणवून भाव जागृत होणे……

राष्‍ट्रीय सुरक्षेच्‍या दृष्‍टीने रायगड येथील अनधिकृत दर्गा त्‍वरित हटवा  !

काही दिवसांपूर्वी येथून मोठ्या दुर्बिणीने टेहाळणी करणार्‍या संशयितांना ग्रामस्‍थांनी पोलिसांच्‍या स्‍वाधीन केले होते. त्‍यामुळे भविष्‍यात या ठिकाणाहून कोणते राष्‍ट्र आणि समाज विघातक कृत्‍य घडण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्‍यामुळे राष्‍ट्रीय सुरक्षेच्‍या दृष्‍टीने या दर्ग्‍यासह येथील सर्व अनधिकृत बांधकाम त्‍वरित हटवावे, अशी मागणी करण्यात येत आहे

राज्‍यात एका दिवसात कोरोनाबाधित रुग्‍णांच्‍या संख्‍येत दुपटीने वाढ !

महाराष्‍ट्रात २७ मार्च या दिवशी कोरोनाबाधित नवीन २०५ रुग्‍ण आढळले; मात्र २८ मार्च या दिवशी ४५० नवीन रुग्‍ण आढळले. म्‍हणजे एकाच दिवशी कोरोनाबाधित रुग्‍णांच्‍या संख्‍येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पोलीस खात्‍याकडे साडेपाच कोटींचे भाडे थकीत !

कोट्यवधींची थकबाकी का राहिली ? याचा अभ्‍यास होणे आवश्‍यक आहे. पुढे अशी थकबाकी राहू नये, यासाठी काय उपाययोजना काढणार ? हेही ठरवायला हवे !

तुळजापूर विकास आराखड्याचे जिल्‍हाधिकार्‍यांना सादरीकरण !

अनुमाने १ सहस्र १०० कोटी रुपये व्‍यय येणारा विकास आराखडा २७ मार्च या दिवशी जिल्‍हाधिकारी कार्यालयात सादर करण्‍यात आला.

ठाणे पोलिसांनी बजावली ७ जणांना नोटीस

मुंब्रा येथील वन विभागाच्‍या जागेतील अनधिकृत दर्ग्‍यांवर कारवाई केली नाही, तर त्‍याशेजारी हनुमान मंदिर बांधण्‍याची चेतावणी मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिली होती. त्‍यानंतर जाधव यांना धमकी दिल्‍याचा संदेश सामाजिक माध्‍यमांवर प्रसारित झाला होता.