राज्‍यात एका दिवसात कोरोनाबाधित रुग्‍णांच्‍या संख्‍येत दुपटीने वाढ !

मुंबई – महाराष्‍ट्रात २७ मार्च या दिवशी कोरोनाबाधित नवीन २०५ रुग्‍ण आढळले; मात्र २८ मार्च या दिवशी ४५० नवीन रुग्‍ण आढळले. म्‍हणजे एकाच दिवशी कोरोनाबाधित रुग्‍णांच्‍या संख्‍येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. या आकडेवारीनुसार रुग्‍णांची संख्‍या वाढल्‍यास राज्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्‍हा वाढण्‍याचा धोका संभवतो. सद्य:स्‍थितीत राज्‍यात कोरोनाबाधित एकूण रुग्‍णांची संख्‍या २ सहस्र ३४३ इतकी आहे. नवीन रुग्‍णांमध्‍ये पुणे येथे सर्वाधिक १५१ रुग्‍ण, तर मुंबईमध्‍ये १३५ रुग्‍ण आढळले आहेत. त्‍या खालोखाल संभाजीनगर, ठाणे, कोल्‍हापूर, नगर आदी जिल्‍ह्यांत कोरोनाचे काही प्रमाणात रुग्‍ण आढळले.