विधानसभा अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करणार; पण चर्चा नंतर ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, २० मार्च (वार्ता.) – २७ मार्चपासून चालू होणार्‍या गोवा विधानसभेच्या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प सादर केला जाईल; मात्र या अर्थसंकल्पाविषयीची चर्चा विधानसभेच्या पुढील अधिवेशनामध्ये करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘अधिवेशनामध्ये कोणत्या दिवशी अर्थसंकल्प सादर करणार, याचा दिनांक निश्चित झालेला नाही. विधानसभेचे अधिवेशन २७ मार्च ते ३१ मार्च या ५ दिवसांत घेण्यात येणार होते; परंतु ३१ मार्च या दिवशी रामनवमी असल्याने अधिवेशन ४ दिवस करण्यात आले.’’ ३१ मार्चनंतर अधिवेशनाचे दिवस वाढवले जातील का ? या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘आणखी काही कामकाज नसेल, त्यामुळे अधिवेशनाचे दिवस वाढवण्याची आवश्यकता नाही.’’