फरिदाबाद (हरियाणा) येथे ‘आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवा’त सनातन संस्थेचा सहभाग

फरिदाबाद (हरियाणा) – हरियाणा सरकारच्या वतीने येथील सेक्टर १२ च्या एच्.एस्.व्ही.पी. कन्व्हेन्शन सभागृहामध्ये ‘आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाचा अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला. या संमेलनात सनातन संस्थेचे साधक श्री. गुलशन किंगर यांनी व्याख्यानात सांगितले, ‘दैवी संपदा, म्हणजे आपले गुण आणि आसुरी संपदा, म्हणजे आपले दोष आहेत, तसेच याविषयी गीतेच्या १८ व्या अध्यायात माहिती दिली आहे.’

या व्याख्यानानंतर अनेक जिज्ञासू इतरांनाही सांगत होते, ‘आपण आसुरी संपदेला गुरुकृपायोगानुसार साधना करून स्वभावदोष अन् अहं निर्मूूलन या प्रक्रियेने दूर करू शकतो.’ या महोत्सवात सहभाग घेतल्यानिमित्त हरियाणा सरकारच्या वतीने वल्लभगडचे भाजप आमदार श्री. मूलचंद शर्मा यांच्या हस्ते सनातन संस्थेला मानचिन्ह देऊन सन्मानित केले. या वेळी भाजपचे आमदार श्री. सतीश फागना यांनी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. याप्रसंगी त्यांना सनातनच्या सौ. तृप्ती जोशी यांनी हिंदी भाषेतील ‘सनातन पंचांग २०२५’ भेट दिले.