खंडाळा पोलिसांच्या विरोधात यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार प्रविष्ट !

  • बजरंग दल कार्यकर्त्याला विनाकारण मारहाण केल्याचे प्रकरण

  • कार्यकर्त्याच्या उजव्या हाताचा अस्थीभंग

प्रतिकात्मक छायाचित्र

शेंबाळ पिंपरी (जिल्हा यवतमाळ), १७ मार्च (वार्ता.) – पुसद तालुक्यातील शेंबाळ पिंपरी येथील बजरंग दल कार्यकर्ता महेश बंडू सुरोशे (वय २४ वर्षे) यांनी त्यांना खंडाळा पोलिसांनी विनाकारण मारहाण केली, याविषयीची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांच्या कार्यालयात प्रविष्ट केली आहे.

७ मार्च या दिवशी धुलिवंदनानिमित्त रंग खेळत असतांना महेश आणि अन्य एकजण यांना पोलिसांनी दांडा आणि पाईप यांनी मारहाण केली. त्यात महेश यांचा उजव्या हाताचा अस्थीभंग झाला, तर डाव्या हाताला मुकामार लागला. आधुनिक वैद्यांनी उपचार केले. ‘ही मारहाण पोलिसी वचक निर्माण करण्यासाठी केली गेली’, असे जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ‘याविषयीची चौकशी करून मला न्याय द्यावा’, अशी विनंती महेश यांनी केली आहे.

संपादकीय भूमिका

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणारे पोलीस धर्मांधांसमोर मात्र शेपूट घालतात, हे लक्षात घ्या !