‘जमात-उल-मुजाहिदीन-बांगलादेश’चा आतंकवादी आरिफ हुसेन दोषी

बेंगळुरू – ‘जमात-उल-मुजाहिदीन-बांगलादेश’ या आतंकवादी संघटनेचा आतंकवादी आरिफ हुसेन याला येथील विशेष न्यायालयाने दोषी ठरवले, अशी माहिती ‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे’ने (‘एन्आयए’ने) दिली. ‘जमात-उल-मुजाहिदीन-बांगलादेश’ने दरोडा घातल्याच्या प्रकरणातील दोषी ठरवलेला तो नववा आरोपी आहे.

आरिफ हुसेन याला भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली दोषी ठरवून ७ वर्षांचा सश्रम कारावास आणि दंड ठोठावण्यात आला आहे. ‘जमात-उल-मुजाहिदीन-बांगलादेश’साठी निधी उभारण्यासाठी शहरभर दरोडा घालण्यात या आरोपींचा सहभाग होता, असे ‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे’ने सांगितले.

संपादकीय भूमिका

  • अशा आतंकवाद्यांना तात्काळ फासावर लटकवल्यास आतंकवादी कारवायांवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला यश येईल !