हिंदू ग्राहकांना हलाल रहित पदार्थ त्वरित उपलब्ध करून द्या ! – ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ची मागणी

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील ‘के.एफ्.सी.’च्या व्यवस्थापकांना निवेदन

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – ‘के.एफ्.सी.’सारख्या बहुराष्ट्रीय आस्थापनांकडून १०० टक्के ‘हलाल’ प्रमाणित उत्पादनांची विक्री करण्यात येते. त्यामुळे भारतातील बहुसंख्य हिंदू आणि शीख यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर ‘के.एफ्.सी.’ आस्थापनाने हिंदु ग्राहकांना हलाल रहित पदार्थ त्वरित उपलब्ध करून द्यावेत, तसेच दुकानांमध्ये ‘हलाल आणि हलाल रहित’ पदार्थ उपलब्ध असल्याचे ‘माहिती फलक’ लावावेत’, यांसाठी ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’च्या वतीने येथील ‘के.एफ्.सी.’चे व्यवस्थापक श्री. राजकुमार पाठक यांना निवेदन देण्यात आले. या वेळी ‘महावीर सेना संबंध कमिटी फॉर सर्व्हिस अँड डेव्हल्पमेंट’ संस्थेचे लक्ष्मणपुरी शहरमंत्री श्री. सुमित पांडेय, ‘आव्हान धर्म रक्षारथ’चे सर्वश्री शिवांश त्रिवेदी, शशांक परिहार, धर्मप्रेमी डॉ. शुभम शुक्ला, ‘बाबा टीकाराम दास हनुमान मंदिरा’चे सेवक श्री. कृष्णा मिश्रा आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रशांत वैती उपस्थित होते.