पाकिस्तान हा आतंकवाद्यांचा निर्यातदार  ! – भारत

नवी देहली – काश्मीरचा राग आळवल्यामुळे भारताने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर पाकिस्तानला चपराक लगावली आहे. ‘आंतरसंसदीय संघा’मध्ये बोलतांना प्रथम पाकिस्तानच्या प्रतिनिधीने काश्मीरचा उल्लेख केला. त्यांचे संबोधन संपल्यानंतर  प्रत्युत्तर देतांना भारताने पाकिस्तानला ‘आतंकवाद्यांचा निर्यातदार’ असे संबोधले म्हटले.

बहरीनची राजधानी मनामा येथे १४६ व्या ‘आंतरसंंसदीय संघा’मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करतांना भाजपचे खासदार डॉ. सस्मित पात्रा यांनी हे प्रत्युत्तर दिले. जम्मू आणि काश्मीर, तसेच लडाख यांवर पाकिस्तानचा कोणताही अधिकार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. ते म्हणाले, ‘‘आम्ही अनेकदा पाकिस्तानला भारतीय क्षेत्रांवरील अवैध ताबा सोडण्याचे आवाहन केले आहे. आतंकवाद्यांचा निर्यातदार आणि जम्मू-काश्मीरमधील आतंकवादी आक्रमणस उत्तरदायी असणारा पाक दुसरीकडे आंतरराष्ट्रीय व्यासपिठांवर मानवाधिकारांच्या गोष्टी करतो.’’