आमची बँकींग प्रणाली पूर्णपणे सुरक्षित ! – राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

अमेरिकेतील २ बँकांच्या दिवाळखोरीचे प्रकरण

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

वॉशिंग्टन (अमेरिका) – सिलिकॉन व्हॅली आणि सिग्नेचर बँक दिवाळखोर झाल्यानंतरही अमेरिकेतील बँकींग प्रणाली पूर्णपणे सुरक्षित आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केला.

बायडेन म्हणाले की, देशभरातील लहान व्यावसायिकांची या बँकांमध्ये खाती होती. हे लक्षात घेता त्या बँका त्यांच्या कर्मचार्‍यांना सहज वेतन देऊ शकतील. त्यासाठी करदात्यांना एक पैसाही खर्च करण्याची आवश्यकता भासणार नाही. मी संसद आणि बँक नियामक यांना बँकेचे नियम अधिक कठोर करण्यासाठी सांगणार आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारे बँका दिवाळखोर होऊ नयेत, तसेच अमेरिकेतील लहान व्यावसायिकांचे रक्षण होईल.