(म्हणे), ‘रात्री २ वाजता तरुणांना अटक का करता ?’ – जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस  

शीतल म्हात्रे प्रकरणातील तरुणांच्या अटकेवर आव्हाडांचा आक्षेप !

‘…अशा गोष्टी करतांना तरुणांना काही वाटले नाही का ?’ – शंभूराज देसाई, मंत्री

मुंबई, १४ मार्च (वार्ता.) – शिवसेना (शिंदे गट) नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक ‘मार्फ’ व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी ठाकरे गटातील काही जणांना अटकही करण्यात आली आहे. याविषयी १४ मार्च या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणातील तरुणांना रात्री २ वाजता अटक करण्यावर आक्षेप घेतला. ते म्हणाले, ‘‘ रात्री २ वाजता पोलिसांनी घरांतून १४ तरुणांना अटक केली. अशी अटक केल्यावर हे प्रकरण संवेधनशील होईल.’’

सौजन्य एबीपी माझा 

यावर उत्तर देतांना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, ‘‘हे प्रकरण गंभीर आहे. तरुणांना रात्री २ वाजता उचलले; मात्र अशा गोष्टी करतांना त्यांना काही वाटले नाही का ?
शीतल म्हात्रे आणि राज प्रकाश सुर्वे यांनी या प्रकरणी तक्रार केली आहे. तक्रारीनुसार तरुणांना अटक करण्यात येत आहे. त्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार मॉर्फींग करतांना झाला आहे. कोणत्याही स्त्रीच्या मनाला हे सहन होणार नाही. शीतल म्हात्रे या अजून या धक्क्यातून सावरलेल्या नाहीत. या प्रकरणाचा अन्वेषणाचा हा भाग आहे.’’
या वेळी सत्ताधारी आमदारांनी घोषणा देत शंभूराज देसाई यांचे समर्थन केले.