वणव्यामुळे म्हादई अभयारण्याचे ३० लाख चौ.मी. जंगलक्षेत्र जळून खाक !

हे प्रकरण गोव्याचे अस्तित्व टिकवण्याच्या दृष्टीने घातक ठरणारे आहे. असे प्रकार पुन्हा घडल्यास त्याचे मोठे दुष्परिणाम गोमंतकियांना भोगावे लागणार आहेत.

कोलगाव (सिंधुदुर्ग) येथे नवीन इमारत बांधूनही शाळा भरते जुन्याच धोकादायक इमारतीत !

जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ ची नवी इमारत बांधून १ वर्ष पूर्ण झाले आहे. आता श्रेयवाद बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या जीविताच्या दृष्टीने शाळेच्या नवीन इमारतीचे नियंत्रण मुख्याध्यापकांकडे द्यावे, अशी मागणी पालकांनी केली आहे.  

गोवा : हज समिती अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यावर फेरविचार करा !

सर्वसामान्य माणूस पोटाला चिमटा काढून कर भरतो, तो हजवाल्यांची पोटे भरण्यासाठी नव्हे, तर देशाच्या विकासासाठी आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या निर्णयावर फेरविचार करावा, असे फळदेसाई यांनी शेवटी म्हटले आहे.

‘सनबर्न’ला अनुज्ञप्ती कशी दिली ? याची माहिती द्या ! – उच्च न्यायालय

२७ डिसेंबर २०२२ या दिवशी अनुज्ञप्तीसाठी अर्ज करून दुसर्‍या दिवशी म्हणजे २८ डिसेंबर २०२२ ला महोत्सवाला अनुज्ञप्ती ही देण्यात आली !

अखिल विश्‍व गायत्री परिवार हरिद्वार यांच्या वतीने कोकणामध्ये २४ कुंडी गायत्री महायज्ञ

कुडाळ, राजापूर, रत्नागिरी आणि चिपळूण येथील नागरिकांनी आणि स्वत:च्या संस्कृतीविषयी आस्था असणार्‍यानी अवश्य भाग घ्यावा आणि संस्कृती जागरणाचे कार्य पुढे चालू ठेवावे, असे आवाहन गायत्री परिवाराकडून करण्यात येत आहे.

चिपळुणात भटक्या कुत्र्यांचे केले जात आहे निर्बिजीकरण !

‘व्हेट्स फॉर अ‍ॅनिमल्स’ या संस्थेने भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि ‘अँटी रेबीज’ हे लसीकरण विनामूल्य करण्याचे आश्‍वासन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांना दिले आहे. त्यानुसार ६ मार्चपासून कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे चालू करण्यात आले आहे.

खेड पोलिसांनी ‘अपहरण नाट्या’चे केले तत्परतेने अन्वेषण !

होळीच्या निमित्ताने रेल्वेमध्ये अधिक गर्दी आणि वेळेची मर्यादा असतांनाही या तीनही मुलींचा ‘मांडवी एक्सप्रेस’ मध्ये शोध घेण्यात आला आणि शेवटी या मुली एका बोगीत सापडल्या. त्यानंतर तीनही मुलींना खेड पोलीस ठाण्यात आणले.

विज्ञानाचा खरा एकमेव उपयोग !

‘विज्ञानाचा खरा एकमेव उपयोग म्हणजे ‘अध्यात्मशास्त्र हे परिपूर्ण शास्त्र आहे’, हे विज्ञानामुळे बुद्धीप्रामाण्यवाद्यांना काही प्रमाणात तरी दाखवता येते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

जालना येथील मोतीबाग तलावात मृत माशांचा खच !

औद्योगिक वसाहतीतील कारखान्‍यातील विषारी द्रव्‍य आणि रासायनिक पदार्थांची वाहतूक करणार्‍या ट्रकच्‍या ‘वॉशिंग सेंटर’चे पाणी तलावात मिसळत असल्‍यामुळे सहस्रो माशांचा मृत्‍यू झाल्‍याचे सांगण्‍यात येत आहे.