राष्ट्रीय बजरंग दलाची मागणी
पणजी, ७ मार्च – गोव्यातील हज समिती अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा आणि अन्य सवलती देण्याचा विचार सरकारने खायचे अन् दाखवायचे दात वेगळे असल्याचे सिद्ध केले असल्याचा आरोप राष्ट्रीय बजरंग दलाचे गोवा विभाग प्रमुख नितीन फळदेसाई यांनी केला आहे. सरकारने यावर फेरविचार न केल्यास याचे परिणाम गोव्यातील हिंदु समाजावर येणार्या काळात झालेले दिसतील, असेही फळदेसाई म्हणाले.
हज समितीच्या अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देणे, त्यांना ५ कर्मचारी, त्यांच्या दिमतीला एक वाहन, तसेच ३० लाखांवरून एकदम १ कोटीचे आर्थिक प्रावधान हा सर्वसामान्य जनतेवर अन्याय आणि अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी घेतलेला निर्णय असल्याचे फळदेसाई म्हणाले.
सर्वसामान्य माणूस पोटाला चिमटा काढून कर भरतो, तो हजवाल्यांची पोटे भरण्यासाठी नव्हे, तर देशाच्या विकासासाठी आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या निर्णयावर फेरविचार करावा, असे फळदेसाई यांनी शेवटी म्हटले आहे.
हे वाचा –
♦ हज समितीच्या अध्यक्षांना मिळणार राज्यमंत्रीपदाचा दर्जा !
https://sanatanprabhat.org/marathi/660022.html