
चिपळूण (रत्नागिरी) – शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या वाढत चालली असून नागरिकांच्या तक्रारींनंतर येथील नगर परिषद प्रशासन आणि कराड येथील ‘व्हेट्स फॉर अॅनिमल्स’ या संस्थेकडून शहरात भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जात आहे.

चिपळूण नगर परिषदेने भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणावर लाखो रुपयांचा खर्च केला आहे; मात्र तरीही सर्वत्र, सार्वजनिक ठिकाणी, तसेच गल्लोगल्ली कुत्र्यांचा त्रास जनसामान्यांना सहन करावा लागत आहे. या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे, हा एकमेव पर्याय असल्याने नगर परिषद प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
‘व्हेट्स फॉर अॅनिमल्स’ या संस्थेने भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि ‘अँटी रेबीज’ हे लसीकरण विनामूल्य करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांना दिले आहे. त्यानुसार ६ मार्चपासून कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे चालू करण्यात आले आहे.
पुणे शहरातील १०० वर्षांपूर्वीच्या वृक्षतोडीस विरोध ! – श्रीनाथ भिमाले, अध्यक्ष, स्थायी समिती
नवीन घाटांची कामे जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रशासनाचा आदेश
राजापूर तालुक्यात पर्यावरणपूरक प्रकल्पांची उभारणी करा !
असाहाय्य हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग : वडिलांना जिवे मारण्याची धमकी !
देवस्थाने सुरक्षित राखण्यासाठी विश्वस्तांची प्रभावी एकजूट आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
विशेष अन्वेषण पथकाद्वारे अन्वेषण करा ! – श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची मागणी