बांगलादेशात दुर्गादेवीच्या मंदिरावर अतिरेकी मुसलमानांचे आक्रमण !

इस्लामी बांगलादेशातील हिंदूंची असुरक्षित मंदिरे !

ढाका (बांगलादेश) – येथील ठाकूरगाव जिल्ह्यात असलेल्या रुहिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुर्गादेवीच्या मंदिरावर अतिरेकी मुसलमानांनी आक्रमण केले. धर्मापूर गावात असलेल्या या मंदिरातील दुर्गादेवीची मूर्ती तोडण्यात आली, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्याने ट्वीट करून दिली.