काश्मिरात ३४ वर्षांनंतर २०० चित्रपटांचे चित्रीकरण !

काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रहित झाल्याचा परिणाम !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – वर्ष २०१९ मध्ये काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रहित झाल्यानंतर गेल्या २ वर्षांत बॉलीवूडचे २०० चित्रपट आणि वेब सिरीज यांच्या चित्रीकरणाला अनुमती देण्यात आली. हा गेल्या ३४ वर्षांचा विक्रमी आकडा आहे.

सौजन्य जेके अपडेट 

१. वर्ष २०२१ मध्ये ‘जम्मू-काश्मीर चित्रपट विकास परिषदे’ची स्थापना करण्यात आल्यानंतर चित्रपटांच्या चित्रीकरणामधील अडथळे दूर झाले आहेत.

२. काश्मिरात ९० च्या दशकाच्या प्रारंभापासून उफाळलेल्या जिहादी आतंकवादामुळे चित्रपटांचे छायाचित्रीकरण जवळपास बंदच होते. आता तेथील स्थिती बर्‍यापैकी सुधारल्याने बॉलीवूडसह दक्षिण भारतीय निर्मातेही तेथे चित्रीकरण करत आहेत. तसेच यामुळे १ सहस्रांहून अधिक स्थानिक कलावंतांना सहजपणे काम मिळाले आहे.

३. निर्माते आता काश्मीरच्या गुलमर्ग, पहलगाम, दल सरोवर या पारंपरिक स्थळांसह बांदीपोर्‍यातील गुरेज आणि वुलर, दूधपथरी, योशमर्ग आदी ठिकाणीही चित्रीकरण करत आहेत.

संपादकीय भूमिका 

  • भारत शासन काश्मिरी जनतेवर अत्याचार करत असल्याची आवई उठवणार्‍या ‘बीबीसी’, ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’ यांसारख्या पाश्‍चात्त्य प्रसारमाध्यमांना आता या घटनेवरून जाब विचारणे आवश्यक !
  • यासमवेतच काश्मीर खोर्‍यात काश्मिरी हिंदूंचे सुरक्षित पुनर्वसन करण्यासाठी ठोस पावले उचलली गेली, तरच तेथे हिंदू सुरक्षित रहातील, हेही तितकेच खरे !