कानपूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍यांना अटक !

  • तैवानी भाषेतील साहित्य सापडले !

  • गुप्तचर यंत्रणा करत आहेत चौकशी !

कानपूर (उत्तरप्रदेश) – कानपूर पोलिसांनी चांगली नोकरी, व्यवसाय, विवाह आदी आमिषे दाखवून गरीब हिंदूंचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या अभिजीत आणि रजत यांना येथील एका सदनिकेतून अटक केली. तसेच जीवन, शिवांग, शीतल, जाबिन, राणाजी आणि एकाला कह्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे तैवानी भाषेत लिहिलेली पुस्तके सापडली आहेत. त्यांची चौकशी आतंकवादविरोधी पथक, गुप्तचर विभाग, सैन्य गुप्तचर विभाग आदी यंत्रणांकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

१. स्थानिक नागरिकांनी या सदनिकेत धर्मांतर होत असल्याची तक्रार केली होती. तसेच विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनीही येथे जाऊन पाहिले असता तेथे ५० हून अधिक महिला आणि पुरुष आढळले होते. विहिंपचे पदाधिकारी आनंद सिंह यांनी सांगितले की, येथे आम्हाला ख्रिस्ती धर्माची संबंधित साहित्य सापडले. येथे ८ ते १० जणांना हिंदु धर्म सोडून ख्रिस्ती होण्यास सांगण्यात आले होते.

२. सदनिकेत भ्रमणसंगणक सापडला असून त्यात धर्मांतराविषयीचे साहित्य सापडले. चौकशीत ज्यांना आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्यात आले अशा ४ जणांची माहिती मिळाली. त्यांनी धर्मांतर केल्याचे मान्य केले आहे. पोलीस आता अटक करण्यात आलेल्यांना अर्थपुरवठा कोण करत होता, याची चौकशी करत आहेत.

संपादकीय भूमिका 

  • हिंदूंच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये त्यांनी कधी अन्य धर्मियांचे धर्मांतर केलेले नाही; मात्र जगात सर्वाधिक धर्मांतर हिंदूंचेच करण्यात आले आहे. याला हिंदूंचा नेभळटपणाच उत्तरदायी आहे. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
  • देशात धर्मांतराच्या विरोधात कठोर कायदा नसल्याने हिंदूंचे धर्मांतर चालूच आहे, हे हिंदूंना लज्जास्पद !