पुणे येथील लोक अदालतीतील तडजोडीतून ३१ कोटी ३९ लाख रुपयांची थकबाकी वसूल !

जिल्‍हा परिषदेच्‍या ग्रामपंचायत विभागाच्‍या वतीने गावागावांतील घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी आयोजित करण्‍यात आलेल्‍या लोकअदालतीतील तडजोडीतून ग्रामपंचायतींना ३१ कोटी ३९ लाख १ सहस्र ६३२ रुपयांची थकबाकी वसूल करण्‍यात यश आले आहे.

महापुरुषांच्‍या व्‍यापक विचारांची उंचीसुद्धा आपण गाठू शकत नाही ! – श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

खासदार भोसले पुढे म्‍हणाले की, समाजात अशा प्रकारची विकृती आहे. त्‍यामध्‍ये वाढच होत आहे. असे का होते ? हे लक्षात येत नाही. महापुरुषांवर बोलण्‍याऐवजी देशाच्‍या विकासासाठी विचार आणि वेळ व्‍यय केला, तर अधिक उचित ठरेल.

मद्याच्‍या नशेत पोलिसांना खोटी माहिती देणारा अटकेत !

कायदा-सुव्‍यस्‍थेचा धाकच उरला नसल्‍याचे लक्षण !

राजकारण आणि साधना

‘हल्लीचे राजकारण रसातळाला नेते, तर साधना देवाकडे नेते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘पंतप्रधान श्री’ योजनेतून विद्यार्थ्‍यांना आनंददायी शिक्षण मिळणार, महाराष्‍ट्रातील ८४६ शाळांची निवड !

शाळेतून गळती झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारसमवेत सामंजस्य करार केला आहे.

लव्‍ह जिहादविषयी केंद्र सरकारच्‍या निर्णयाला सुप्रिया सुळे यांना विरोध करता येणार नाही ! – राम कदम, नेते, भाजप

श्रद्धा वालकर हत्‍या प्रकरणानंतर शिंदे-फडणवीस सरकारने आंतरधर्मीय विवाह समन्‍वय समिती गठीत केली आहे; परंतु या समितीला एकूण २८ संघटनांनी विरोध केला आहे.

बारामती येथील काकांनी राज्‍यात भ्रष्‍टाचाराचे अड्डे बनवून ठेवले आहेत ! – आमदार प्रशांत बंब

बंब पुढे म्‍हणाले की, गंगापूर साखर कारखान्‍याच्‍या निवडणुकीत १ सहस्र मतांच्‍या भेदाने आमच्‍या पॅनलचा पराभव झाला आहे. तरीही सहस्रो मतदारांनी विश्‍वास ठेवल्‍याविषयी मी त्‍यांचे आभार व्‍यक्‍त करतो.

पुन्हा संधी !

न्यायमूर्ती नझीर ते नाहीत, जे योग्य आणि अयोग्य यांमध्ये तटस्थ रहातात. ते योग्य आणि अयोग्य यांच्या लढ्यात योग्य बाजूने उभे रहाणारे आहेत’, अशा प्रकारे तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी त्यांचे कौतुक केले होते. सध्याचे दिवस कट्टरतावादाचे आहेत. अशा स्थितीत देशहितासाठी धार्मिक संस्कार बाजूला ठेवणे, हे मोठे आहे.

स्‍तनदा मातांसाठी रेल्‍वेस्‍थानकावर लवकरच ‘फीडिंग कॉर्नर’ कार्यान्‍वित करणार ! – इंदुराणी दुबे, पुणे विभागीय व्‍यवस्‍थापक

रेल्‍वेस्‍थानकावर स्‍ट्रॉबेरी विकण्‍याविषयी लेखी प्रस्‍ताव दिल्‍यास त्‍यावर सकारात्‍मक विचार करणार आहोत. सातारा जिल्‍ह्यातील सर्व  रेल्‍वेस्‍थानकांमध्‍ये सी.सी.टी.व्‍ही. छायाचित्रक बसवण्‍याविषयी लवकरच सकारात्‍मक निर्णय घेण्‍यात येईल.