मद्याच्‍या नशेत पोलिसांना खोटी माहिती देणारा अटकेत !

मुंबई – मद्याच्‍या नशेत अनेक वेळा पोलिसांना दूरभाष करून खोटी माहिती देणारा सूरज जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे. बाँबस्‍फोटाची धमकी दिल्‍याप्रकरणी त्‍याच्‍या विरोधात ६ गुन्‍हे नोंद आहेत. १३ फेब्रुवारीला त्‍याने मुख्‍य नियंत्रण कक्षात संपर्क करून २ अन्‍य धर्मीय व्‍यक्‍ती आर्.डी.एक्‍स्.द्वारे डोंगरी परिसर उडवून देणार असल्‍याची माहिती दिली. प्रत्‍यक्षात घटनास्‍थळी असे काहीही सापडले नाही. पोलिसांनी त्‍याचा भ्रमणभाष कह्यात घेतला आहे. त्‍याने याआधीही मद्याच्‍या नशेत असे प्रकार केल्‍याचे उघड झाले आहे.

संपादकीय भूमिका 

कायदा-सुव्‍यस्‍थेचा धाकच उरला नसल्‍याचे लक्षण !