महापुरुषांच्‍या व्‍यापक विचारांची उंचीसुद्धा आपण गाठू शकत नाही ! – श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

सातारा – छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्‍यासह इतर महापुरुषांनी देशासाठी अमूल्‍य योगदान दिले आहे. त्‍यातून बोध घेऊन समाजासाठी काम करणे महत्त्वाचे आहे. महापुरुषांनी जे व्‍यापक विचार मांडले, त्‍याची उंचीसुद्धा आपण गाठू शकत नाही. आजच्‍या घडीला जाती-जातींमध्‍ये द्वेष पसरवण्‍याचे काम चालू आहे, असे प्रतिपादन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले.

नाशिक येथे भाजप कार्यकारिणीची बैठक चालू आहे. या बैठकीनंतर त्‍यांनी प्रसिद्धीमाध्‍यमांशी संवाद साधला.

खासदार भोसले पुढे म्‍हणाले की, समाजात अशा प्रकारची विकृती आहे. त्‍यामध्‍ये वाढच होत आहे. असे का होते ? हे लक्षात येत नाही. महापुरुषांवर बोलण्‍याऐवजी देशाच्‍या विकासासाठी विचार आणि वेळ व्‍यय केला, तर अधिक उचित ठरेल.