‘पंचमहाभूत लोकोत्सवा’त सनातन संस्थेचा कक्ष !

या महोत्सवात सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचा कक्ष ‘डी-७०’ येथे लावण्यात आला आहे. हा कक्ष सकाळी ९ ते रात्री ८.३० या वेळेत जिज्ञासूंना पहाण्यासाठी खुला असणार आहे.

पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरण्याचा कट पूर्वनियोजित ! – उद्धव ठाकरे

नुकतेच निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केले.

‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.’चे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना ‘उद्यम कौस्तुभ’ पुरस्कार प्रदान !

‘ब्राह्मण बिजनेस नेटवर्क ग्लोबल संस्थे’च्या मुंबई विभागाच्या वतीने ब्राह्मण उद्योजकांसाठी दोन दिवसांच्या परिषदेचे येथे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी उद्योग जगतात उल्लेखनीय कार्य करणार्‍या ब्राह्मण उद्योजकांचा सन्मान करण्यात येतो.

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाही शिवसेनेचा पक्षादेश लागू असेल ! – भरत गोगावले, पक्षप्रतोद, शिवसेना

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून पक्षाच्या सर्व ५६ आमदारांना पक्षादेश काढला जाणार आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाही हा पक्षादेश लागू असेल. त्याचे पालन सर्वांनाच करावे लागणार आहे.

शिवसेनेच्या आमदारांच्या पात्र-अपात्रतेविषयी सर्वाेच्च न्यायालयात ३ दिवस होणार सुनावणी !

निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह दिल्यामुळे याचा परिणाम या खटल्यावर होण्याची शक्यता आहे.

भारतियांनी लंडनच्या ‘संसद चौका’मध्ये केली ‘शिवजयंती’ साजरी !

लंडन शहरात भारतीय संस्कृती जोपासत भारतातील अनेक राज्यांतील विद्यार्थी या वेळी अधिवक्ता संग्राम शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्याकरता एकत्र आले होते.

भीमा नदीपात्रात प्रभु श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची साकारण्यात आली प्रतिकृती !

छत्रपती शिवराय आणि प्रभु श्रीराम या योद्ध्यांचा पराक्रम अनमोल आहे. यासाठी त्यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या असल्याचे नगरे यांनी सांगितले. प्रतिकृतींच्या दर्शनासाठी भोई समाजाच्या वतीने विनामूल्य होडीची व्यवस्था करण्यात आली आहे.

पिंपरी (पुणे) येथे आचारसंहिता कक्षाकडून ४ सहस्र ‘पोस्टर्स’ आणि ‘बॅनर्स’ यांवर कारवाई !

चिंचवड पोटनिवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहिता चालू आहे. त्यादृष्टीने आचारसंहितेचा भंग होऊ नये, यासाठी विविध पथकांकडून प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवले जात आहे.

महाशिवरात्रीनिमित्त पुणे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने ५० हून अधिक ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन !

महाशिवरात्रीनिमित्त पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने, ग्रंथप्रदर्शन, फ्लेक्स प्रदर्शन, फलक लेखन, प्रत्यक्ष आणि ऑनलाईन व्याख्याने आदी माध्यमांतून व्यापकस्तरावर धर्मप्रसार करण्यात आला.

माझ्या गोमांस खाण्यावर भाजपचा आक्षेप नाही !

मेघालयाचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष अर्नेस्ट मावरी यांचे विधान
भाजपने गोमांसबंदी केली नसल्याचाही खुलासा !